Lagna Muhurat 2025- 2026 Marathi
पिंपरी: लग्न हा जीवनातील एक खास प्रसंग असतो. त्यामुळे लग्नकार्य हे शुभ मुहूर्त पाहूनच केले जाते. तुलसी विवाहानंतर लग्नाचे मुहूर्त काढले जातात. त्यानंतर सन 2026 मध्ये हे वर्ष विवाहेच्छुकांसाठी खास असणार आहे. अनेक जण येत्या नवीन वर्षात लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. यंदाच्या लग्न हंगामात 68 मुहूर्त आहेत. (Latest Pimpri chinchwad News)
नोव्हेंबर महिन्यात लग्नाचा हंगाम सुरू होईल. 2 नोव्हेंबर रोजी तुलसी विवाह आहे. या दिवसापासून लग्नाच्या मुहूर्त काढले जातात. 2026 मध्ये किती दिवस लग्नाचा सनई चौघडा वाजवला जाईल ते जाणून घेऊ या.
नोव्हेंबर 2025 विवाह मुहूर्त : - 3, 4, 7, 13, 15, 16, 22, 23, 25, 26, 27, 30 नोव्हेंबर या शुभ विवाह तारखा आहेत.
डिसेंबर 2025 मध्ये लग्नाचा मुहूर्त : - 2, 5, 12,13,15 डिसेंबर हे शुभ लग्नाचे मुहूर्त आहेत.
जानेवारी 2026 :- 23, 24, 25, 26, 28, 29
फेबुवारी 2026 मध्ये लग्नाचा मुहूर्त : - 3,5, 7, 8, 10, 11, 12, 20, 22, 25, आणि 26 फेबुवारी हे शुभ लग्नाचे मुहूर्त आहेत.
मार्च 2026 मध्ये लग्नाचा मुहूर्त : - 5, 7, 8, 12, 14 आणि 16 मार्च हे लग्नासाठी शुभ तारखा आहेत.
एप्रिल 2026 लग्नाचा मुहूर्त : - एप्रिलमध्ये एकूण 5 लग्नाचे मुहूर्त आहेत : - 21, 26, 28 आणि 29, 30
मे 2026 लग्नाचा मुहूर्त - 1, 3, 6, 7, 8, 9, 10, 11, 14 मे हे लग्नाचे शुभ मुहूर्त आहेत.
जून 2026 मध्ये लग्नाचा मुहूर्त : - 20, 22, 23, 24, 27, जून हे लग्नासाठी शुभ तारखा आहेत.
जुलै 2026 लग्नाचा मुहूर्त : - 1, 2, 3, 4, 7, 8, 9, 11 जुलै हे लग्नाचे मुहूर्त आहेत.
गेल्या वर्षीपेक्षा येत्या वर्षी मुहुर्त जास्त आहेत. असे असले तरी अधिक महिना आल्यामुळे मुहुर्त कमी आहेत.
मोहन दाते (पंचागकर्ते)