Lonavala Landslide Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Landslide: लोणावळ्यात दरडीचा थरार; पाटण गावात घरावर दरड कोसळली, तिघे अडकल्याची भीती

मुसळधार पावसाने मावळात पूरस्थिती; बचावकार्य सुरू, मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्ग बंद तर अनेक भागांत रस्ते पाण्याखाली

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाटण गावात रात्री मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे. एका घरावर ही दरड कोसळली असून घरामध्ये तीन व्यक्ती आहेत. संपूर्ण माती व राडारोडा सदर घरावर असून हे नागरिक दरडी खाली अडकले आहेत. या घटनेची माहिती समजताच पाटण गावातील नागरिक तसेच पोलीस व महसूल यंत्रणा या घटनास्थळी दाखल असून दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

लोणावळा शहर व मावळ परिसरामध्ये अक्षरशः आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस पडत आहे. गत 24 तासांमध्ये 625 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. आज सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे.

या कोसळदार पावसामुळे लोणावळा शहर व ग्रामीण परिसरामध्ये सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई पुणे मिसिंग लिं बोगद्याच्या तोंडाजवळ दरड कोसळल्यामुळे मिसिंग लिंकचा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर नायगाव साते या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून अनेक वाहने पाण्यामध्ये अडकले आहेत. पवनानगर भागातील ओझर्डे येथे रस्ता वाहून गेला आहे तर पवनानगर बाजारपेठ व वडगाव मावळ बाजारपेठेमध्ये पाणी घुसले असून रस्त्यांवर तीन ते चार फूट पाणी जमा झाले आहे.

लोणावळा शहर व मावळ तालुक्याला पावसाने अक्षरशा झोडपून काढले आहे. सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. पावसाचा हा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT