Lonavala Heavy Rain Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Heavy Rain: लोणावळ्यात 24 तासांत 625 मिमी पावसाची विक्रमी नोंद; शहर जलमय, जनजीवन विस्कळीत

रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेदरम्यान 450 मिमी पाऊस; रस्ते पाण्याखाली, घरांमध्ये पाणी, टाटा धरण भरले तर इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: लोणावळा शहरामध्ये पाच जुलै रोजी आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस पडत आहे 24 तासांमध्ये लोणावळा शहरात तब्बल 625 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. यापैकी 450 मिमी हा रविवारी रात्री ते सोमवारी पहाटे दरम्यान झाल्यामुळे लोणावळा शहराची पहाट उजाडली ती पाण्याच्या विळख्याने.

संपूर्ण लोणावळा शहरामध्ये पाणीच पाणी झाली आहे सर्व रस्ते पाण्याखाली गेली असून अनेक घरांमध्ये सोसायट्यांमध्ये पाणी घुसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. मुसळधार कोसळणाऱ्या या पावसामुळे लोणावळा शहराचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे.

टाटा धरण पूर्ण भरल्या असून त्याचे पाणी देखील भिंतीवरून लोणावळा शहरामध्ये येत आहे. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असून नदीपात्रातील पाणी हे आजूबाजूच्या परिसरामध्ये घोषणास सुरुवात झाली आहे. निसर्गाचा खूप झाल्याप्रमाणे लोणावळा शहरांमध्ये कोसळधार पाऊस सुरू आहे. मागील आठ दिवसापासून लोणावळा शहरामध्ये सातत्याने पाऊस सुरू असून मागील 72 तासापासून लोणावळा शहरामध्ये अतिवृष्टी सुरू आहे.

आज सोमवारी पहाटेपासून लोणावळा शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्व परिसर जलमय झाला असल्यामुळे शाळांना देखील सुट्ट्या देण्यात आले आहेत अनेक रेल्वे गाड्या ट्रॅकवर पाणी असल्यामुळे थांबवण्यात आले आहेत. नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT