लोणावळा : लोणावळा शहरातील कुणेनामा परिसरातील एका बंगल्यात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर लोणावळा शहर पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली. या कारवाईत रोख रक्कम, महागडे मोबाईल आणि अलिशान गाड्यांसह एकूण ४९ लाख ६४ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बंगल्याचा मालक आणि जुगार खेळणाऱ्यांसह एकूण २२ जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२१ मार्च २०२६ रोजी पहाटे ४:४० वाजण्याच्या सुमारास कुणेनामा (ता. मावळ) येथील एका बंगल्यात ही धडक कारवाई करण्यात आली. करण पाटील या इसमाने हा बंगला मालक हनुमंत एकनाथ थोरबोले (रा. आर के. हॉटेल शेजारी, वरसोली टोलनाका, ता. मावळ) याच्याकडून ६० हजार रुपये भाड्याने घेतला होता व तेथे हा बेकायदेशीर जुगाराचा अड्डा चालवला जात होता. पोलीस हवालदार मयुर काळुराम आबनावे यांच्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी छापा टाकला असता सदर बंगल्यात दोन टेबलांवर 'फ्लॅश' नावाचा तीन पानी जुगार खेळताना आरोपी रंगेहाथ मिळून आले.
या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य (प्लॅस्टिकचे कॉईन, पत्ते), रोख रक्कम, विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल (Apple, Samsung, Vivo, Oppo इ.) आणि ६ अलिशान गाड्या (Hyundai Venue, Kia Seltos, Maruti Swift, Ford Endeavour, Kia Sonet, Volkswagen) असा एकूण ४९ लाख ६४ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी खालील २२ जणांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात (गु.र.नं. ४९/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
१) विशाल रामदास काळे (नवी मुंबई)
२) अक्षय शंकर शेडगे (नवी मुंबई)
३) अजित राजकुमार पंचवाणी (उल्हासनगर)
४) अक्षय मानसिंग मोहिते (नवी मुंबई)
५) इम्रान सलीम शेख (नवी मुंबई)
६) अकबर शफी हुसेन (मुंबई)
७) जहूर सल्लाउद्दीन अन्सारी (नवी मुंबई)
८) रंगनाथ कारभारी औटी (नवी मुंबई)
९) मुकेश सत्यनारायण यादव (मुंबई)
१०) बजरंग शामलाल गुप्ता (नवी मुंबई)
११) महादेवन आर के (नवी मुंबई)
१२) नावेद जिगर मेमण (मुंब्रा, ठाणे)
१३) जितेंद्र उत्तम परदेशी (दिघी, पुणे)
१४) रवी बिपीन सोनपाल (नाशिक)
१५) रमणलाखन यादव (उलवे, रायगड)
१६) गुरुदेव भीमराव जाधव (मुंबई)
१७) हरिओम कुमार रामबिरसिंग (वांद्रे, मुंबई)
१८) आकाश भगवती प्रसाद (वांद्रे, मुंबई)
१९) रंजना गायसी (पणजी, गोवा)
२०) चंदा मगर (पणजी गोवा)
२१) मिनुका मोहरजन (पणजी गोवा)
२२) हनुमंत एकनाथ थोरबोले (बंगला मालक, वरसोली, ता. मावळ)
लोणावळा शहर चे पोलीस अधीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड करत आहेत. या कारवाईमुळे लोणावळा व मावळ परिसरातील अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.