लोणावळा : लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, 2 डिसेंबर रोजी 13 प्रभागांतील 63 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान होणार आहे.
लोणावळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचारासाठी वेळ देण्यात आला आहे. 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिस बंदोबस्तदेखील मोठ्या प्रमाणात लोणावळ्यात दाखल झाला आहे. लोणावळा नगर परिषद इमारतीच्या तळ मजल्यावर मत मोजणी केली जाणार आहे.
लोणावळा शहरातील दोन प्रभागांतील प्रत्येकी एक-एक जागेचे मतदान स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे 2 डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार की संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 21 डिसेंबर रोजी होणार याबाबत स्पष्ट निर्देश नसल्यामुळे मतदार व नागरिक यांच्याच संभ्रम कायम आहे.