पिंपरी : हिंजवडी येथील आयटी कंपन्या राज्यातून बाहेर जात असल्याचे बोलले जात असतानाच आता चारशे नवशिकाऊ तरुणाची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आयटी फोरम पुढे आले असून, त्यांनी कामगार कार्यालयात तक्रार दिली आहे. या घटनेनंतर पोलिस आयुक्त आणि हिंजवडी पोलिसांनी देखील या घटनेची दखल घेतली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले. संबंधित कंपनीने पीडित तरूणांना दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले.
दरम्यान, यामध्ये मोठा घोटाळा होत असल्याने चारशे तरुण रस्त्यावर येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. फेज 2 येथील संबंधित कंपनीबाबत तक्रार देण्यात आली आहे. या संदर्भात कामगार उपायुक्त निखिल वाळके यांच्याशी संपर्क साधला असता, तो होवू शकला नाही.