26 लाखांचा गुटखा जप्त Pudhari
पिंपरी चिंचवड

Gutkha Seizure: कर्नाटकहून विक्रीसाठी आणलेला 26 लाखांचा गुटखा जप्त

पिंपरी-चिंचवड शहरातील बंगळूर-मुंबई महामार्गालगत असलेल्या किवळे येथे डिलिव्हरी मिळणार होती

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : कर्नाटक राज्यातील विजापूर येथून महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मागवण्यात आला. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील बंगळूर-मुंबई महामार्गालगत असलेल्या किवळे येथे डिलिव्हरी मिळणार होती. दरम्यान, मोठ्या वाहनातून इतर दोन लहान वाहनांमध्ये गुटखा खाली करत असताना अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत 26 लाखांच्या गुटख्यासह तब्बल 51 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. 9) किवळे येथील शार्वी रेस्टॉरंटच्या पाठीमागील मोकळ्या जागेत करण्यात आली. (Latest pune News)

प्रकाश मडवालअप्पा खामकर (35, रा. बेळगाव, कर्नाटक), विठ्ठल भीमाप्पा गडद (37, रा. बेळगाव, कर्नाटक), राकेश राणाराम देवासी (29, रा. पाली, राजस्थान), हुकाराम भवरराम देवासी (46, रा. जोधपूर, राजस्थान), बुधाराम उकमाराम देवासी (37, रा. जोधपूर, राजस्थान), पिंटू धर्मराम देवासी (24, रा. बावधन, पुणे. मूळ रा. सुरत, गुजरात), महेंद्र देवासी, सुजित खिंवसरा (कोथरूड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेंद्र देवासी आणि सुजित खिंवसरा यांनी महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी विजापूर येथील निसार अलिमट्टी या व्यापार्‍याकडून गुटखा खरेदी केला. हा गुटखा त्याने सद्दाम लष्करी या मध्यस्थी मार्फत आयशर टेम्पोमधून महाराष्ट्रात पाठवला. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती मिळाली. गुटख्याची डिलिव्हरी मुंबई महामार्गावर किवळे येथे दिली जाणार होती. त्यानुसार, किवळेमधील शार्वी रेस्टोरंटच्या पाठीमागील मोकळ्या जागेत दोन वाहने घेऊन इतर आरोपी आले.

राकेश, हुकमाराम आणि बुधाराम या तिघांनी एक बोलेरो पिकअप आणले. तर, पिंटू याने टेम्पो आणला होता. कर्नाटक येथून आयशर टेम्पोमधून चालक विठ्ठल गडद आणि क्लिनर प्रकाश खामकर आले होते. आयशर टेम्पो मधून बडा दोस्त टेम्पोमध्ये गुटखा भरला होता. तर बोलेरो पिकअपमध्ये गुटखा भरणे सुरु असताना अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा मारून कारवाई केली. कारवाईची चाहूल लागताच आयशर टेम्पोचालक विठ्ठल आणि साठा मालक महेंद्र देवासी हे पळून गेले आहे.

या कारवाईमध्ये एकूण 17 हजार 340 पाकिटांमधून एकूण 26 लाख 120 रुपये किमतीचा गुटखा आणि 25 लाख रुपये किमतीची तीन वाहने असा एकूण 51 लाख 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT