Gudi Padwa Vehicle Sell Pudhari
पिंपरी चिंचवड

Gudi Padwa Vehicle Sell: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाहनखरेदीला उधाण; शहरात 10 हजारांहून अधिक नोंदी

दुचाकींचा सर्वाधिक वाटा, ईव्ही वाहनांकडेही वाढता कल; ऑफर्समुळे ग्राहकांची पसंती

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पिंपरी चिंचवडकरांनी वाहन खरेदीला पसंती दिली आहे. या वर्षी शहरात नव्या दहा हजार 221 वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वांधिक म्हणजेच पाच हजार 805 दुचाकींची नोंद आहे.

गुढीपाडव्याला नवे वाहन घरी आणण्यासाठी नागरिकांची पसंती असते. हा मुहूर्त साधत अनेकजण घर, सोने, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची खरेदी करतात. यंदा 5 ते 19 मार्च या 15 दिवसांत पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात 10 हजार 221 वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये दुचाकींपाठोपाठ तीन हजार 81 कारची संख्या आहे.

वाहन विक्रेत्यांकडून हेल्मेट, ॲक्सेसरिज मोफत देऊन ग््रााहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सरासरी सहा ते सात हजार वाहनांची नोंद होते. यंदाही दुचाकींचे प्रमाण सर्वांधिक आहे. दरम्यान, गतवर्षी 17 ते 30 मार्च या पंधरा दिवसांत 11 हजार 947 वाहनांची नोंद झाली होती.

ईव्ही वाहन खरेदीकडे कल

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शहर परिसरात ई वाहनांच्या खरेदीकडे नागरिकांचा कल होता. यंदा नव्याने सातशे ते आठशे वाहनांची नोंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. पेट्रोल, सीएनजी वाहनांबरोबरच सर्वच कंपन्यांनी ईव्ही वाहने बाजारात विक्रीसाठी आणले आहेत. त्यामुळे त्या वाहनांनादेखील पसंती असल्याचे दिसून आले. त्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विक्रेत्यांकडून वेगवेगळा योजना आणि ऑफरदेखील ठेवण्यात आल्या होत्या. महिला, विद्यार्थी वर्गाने ईव्ही पसंती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT