पिंपर: विशेष ग्रामसभा सुरू असताना ठराव मांडण्यासाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्याने नकार दिला. या कारणावरुन एका व्यक्तीने ग्रामपंचायत अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. ही घटना बुधवारी (दि. 17) दुपारी भूगाव ग्रामपंचायत कार्यालयात घडली.
ग्रामपंचायत अधिकारी जगन्नाथ महादेव भोंग (55, रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कैलास केशव चोंधे (चोंधे-दरा, भुगाव, मुळशी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pimpari chinchwad News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत भूगाव ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी विशेष ग््राामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत आरोपीने दक्षता समिती स्थापन करण्याचा ठराव मांडला.
त्यावर ग्रामपंचायत अधिकारी भोंग यांनी विशेष ग्रामसभेत असा ठराव मांडता येत नसल्याचे कारण सांगितले. या कारणावरुन कैलास याने भोंग यांना शिवीगाळ करत दमदाटी केली, त्यांच्या शर्टची कॉलर पकडून धक्काबुक्की केली आणि सरकारी कामात अडथळा आणला. बावधन पोलिस तपास करत आहेत.
महापालिकेला खेळाडूकडून फक्त मेडल पाहिजे. पण खेळाडूंना त्या प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत. एवढी मोठी महापालिका आहे. मी मुलींच्या कुस्तीसाठी रावेत येथे महापालिकेच्या जागेत एक संकुल करावे यासाठी कित्येक वर्षे पाठपुरावा करत आहे. पण त्याठिकाणी आता कचरा टाकला जात आहे.- हरीश कदम, उपाध्यक्ष, भारतीय कुस्ती संघ
शहरातील क्रीडा मैदाने सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धेसाठी भाड्याने देण्याचे क्रीडा धोरण आहे. ज्या वेळी मैदानांवर कार्यक्रम असतात त्या वेळी खेळाडू जवळपासच्या मैदानावर सराव करतात.- पंकज पाटील, सहायक आयुक्त, क्रीडा विभाग