उद्योजकावर गोळीबार pudhari
पिंपरी चिंचवड

म्हाळुंगे परिसरात उद्योजकावर गोळीबार; दोन अनोळखी व्यक्तींचा शोध सुरू

आरोपी वराळे ते भांबोली या दिशेने पळून गेले

संतोष शिंदे

म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्टील कंपनीचे मालकावर दोन अनोळखी इसमांनी गोळीबार केला असल्याची घटना आज घडली. आरोपी हेल्मेट घालून होंडा शाईन मोटरसायकलवरून आले होते. घटनास्थळी फायरिंग केल्यानंतर आरोपी वराळे ते भांबोली या दिशेने पळून गेले.

या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सर्व हद्दीत नाकाबंदी लावण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस नियंत्रण कक्षाला सतर्क करण्यात आले असून पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनाही कळविण्यात आले आहे. खेड आणि शिक्रापूर परिसरातही नाकाबंदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी पोहोचले असून घटनेचे नेमके कारण आणि आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT