Dudulgaon Wheat Crop Pudhari
पिंपरी चिंचवड

Dudulgaon Wheat Crop: डुडुळगावमध्ये रब्बी हंगामातील गव्हाचे पीक जोमात

थंडी, योग्य लागवड व कृषी मार्गदर्शनाचा फायदा; गव्हाचे दाणे चांगले पोसले

पुढारी वृत्तसेवा

चऱ्होली: रब्बीच्या हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणजे गहू. डुडुळगाव परिसरात यंदा गव्हाचे पीक अत्यंत जोमात आले आहे. नोव्हेंबर महिन्यात गव्हाची पेरणी करण्यात आली होती. साधारण तीन ते साडेतीन महिन्यांत गव्हाचे पीक हाताशी येते. डुडुळगावमध्ये पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असल्यामुळे गव्हाचे पीकदेखील उत्तम दर्जाचे येते. यंदा वातावरणातील गारवा व उत्तम वातावरण यामुळे गव्हू पीम जोमात आले आहे.

यंदा थंडी चांगली असल्यामुळे गव्हाच्या वाढीसाठी पोषक वातावरण मिळाले. त्याचबरोबर या आठवड्यातील ढगाळ वातावरण सोडले तर मागील दोन ते अडीच महिने स्वच्छ आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळाला त्यामुळे गव्हाच्या पिकाची चांगली वाढ झाली. गव्हाच्या ओंब्याची लांबी चांगली असून गव्हाचे दाणेदेखील चांगले पोसले गेले आहेत.

महाराष्ट्रात काही ठिकाणी गव्हावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र, डुडुळगावमधील गव्हाचे पीक यंदा चांगले असल्याचे डुडुळगाव येथील शेतकर्यांनी सांगितले. कृषी अधिकारी अमोल ढवळे व कृषी सहाय्यक बाबासाहेब कराळे यांच्या मार्गदर्शनाने व वेळेवर गव्हाची लागवड केल्यामुळे थंडीचा पूर्ण फायदा गव्हाच्या पिकाला मिळाला. याशिवाय कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खतांचा वेळेवर व योग्य प्रमाणात वापर केल्यामुळे गव्हाचे पीक अत्यंत जोमात आले आहे.

जमिनीची निवड, सुधारित वाण, वेळेवर पेरणी आणि योग्य सिंचन या गोष्टी गव्हाच्या जास्त उत्पादनासाठी महत्त्वाच्या असतात.
प्रभाकर वहिले, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT