डेअरी फार्म उड्डाणपूल pudhari
पिंपरी चिंचवड

डेअरी फार्म उड्डाणपूल जूनमध्ये खुला होण्याची शक्यता

रेल्वे विभागाकडून गर्डर टाकणाच्या कामास विलंब

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील डेअरी फार्म रेल्वे मार्गावर उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. रेल्वे विभागाकडून गर्डर टाकणाच्या कामास विलंब होत असल्याने पुलाचे काम मार्चऐवजी आणखी तीन ते चार महिने लांबणीवर पडले आहे. त्यानंतर पूल वाहतुकीस खुला होईल. त्याकरिता संबंधित ठेकेदाराला मुदतवाढ दिली जाणार आहे.

64 वृक्षांचे पुनर्रोपण

या उड्डाणपूल कामास मार्च 2023 मध्ये वर्कऑर्डर देण्यात आली. पुलाच्या बांधणीसाठी काही वृक्ष अडथळा ठरत असल्याने कामास विलंब झाला. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडे एप्रिल 2023 मध्ये वृक्षतोड व पुनर्रोपणासाठी सादर केलेल्या प्रस्तावास ऑगस्ट 2023 मध्ये मंजुरी मिळाली. पुलाच्या जागेत अडथळा ठरणारे 142 वृक्ष काढण्यात आले. एकूण 64 वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले. वन विभागाने सप्टेंबर 2023 मध्ये झाडांचे मूल्यांकन पूर्ण केले. मार्च 2024 मध्ये वृक्ष तोडीस परवानगी मिळाल्यानंतर मे 2024 मध्ये 142 वृक्ष काढण्यात आले. नोव्हेंबर 2024 मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 64 वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले.

ठेकेदाराला मुदतवाढ

हा पूल रेल्वे विभागाशी संलग्न असल्याने विविध मंजुरी प्रक्रियांमध्ये विलंब होत आहे. रेल्वे विभागाच्या ओव्हर हेड इक्युपमेंट व इतर संरचना बदलण्यासाठी आवश्यक मंजुरी व निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या कामासाठी रेल्वे विभागाने 74 लाख 89 हजार रुपयांची आगाऊ मागणी केली होती. ती रक्कम पालिकेने दिली आहे. रेल्वे विभागाकडून डिजाईन अंतिम होऊन लोहमार्गावरील गर्डरचे काम सुरू करण्यास विलंब झाला आहे. गर्डरचे काम रेल्वे विभाग करणार आहे. रेल्वे विभागाकडून होत असलेल्या विलंबामुळे हा पूल मार्चऐवजी जून किंवा जुलै महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याकरिता संबंधित ठेकेदाराला आणखी मुदतवाढ दिली जाणार आहे.

पालिकेचा दावा खोटा

महापालिकेच्या स्थापत्य विभागाने जानेवारी महिन्यात या कामासंदर्भात प्रेस नोट काढली होती. त्यात हा पूल मार्चअखेरीस पूर्ण होईल, असा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, मार्च महिना संपला तरी, अद्याप 55 टक्केच काम पूर्ण झाल्याचे 29 मार्चच्या प्रेसनोटमध्ये स्थापत्य विभागाने नमूद केले आहे. त्यामुळे मार्चमध्ये पुलाचे काम पूर्ण होणार हा दावा खोटा ठरला आहे.

पिंपरीतील डेअरी फार्म येथील उड्डाण पुलाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. रेल्वे विभागाकडून गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्या विभागाकडून विलंब होत आहे. तो विलंब लक्षात घेता सर्व बाबींच्या विचार करता ठेकेदाराने पुलाच्या कामासाठी मुदतवाढ देण्याचा विचाराधीन आहे.
प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT