सायबर फसवणुक file photo
पिंपरी चिंचवड

टेलिग्रामद्वारे सायबर फसवणुकीचे जाळे

पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

संतोष शिंदे

सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असून, आता नागरिकांना फसवण्यासाठी टेलिग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. पैशांचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगार हे नागरिकांची बँक खाती मिळवतात. या खात्यांचा वापर आर्थिक गुन्हेगारीसाठी होत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

फसवणुकीची मोडस ऑपरेंडी आमिष दाखवून संपर्क साधणे असल्याने हे गुन्हेगार टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवरून नागरिकांशी संपर्क साधतात. चीन किंवा दुबई येथील गेमिंग कंपन्यांसाठी बँक खाती उघडण्याची विनंती करतात. यासाठी कमिशन किंवा इतर आर्थिक मोबदल्याची प्रलोभने दिली जातात.

किरकोळ आमिषाचे मोठे परिणाम : सायबर चोरट्यांच्या प्रलोभनांना बळी पडणे सामान्य नागरिकांसाठी महागात पडू शकते. तपास यंत्रणांच्या चौकशीचा सामना करताना, खातेधारकावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण होते. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकही आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकू शकतात.

...अशी घ्या खबरदारी

अनोळखींशी संपर्क टाळा :

टेलिग्राम किंवा इतर प्लॅटफॉर्मवर अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या संदेशांना प्रतिसाद देण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा.

गोपनीय माहिती सुरक्षितता महत्त्वाची

बँक खाते क्रमांक, इंटरनेट बँकिंग पासवर्ड, जढझ किंवा इतर संवेदनशील माहिती कोणालाही शेअर करू नका.

आमिषाला बळी पडू नका

जास्त नफ्याचे प्रलोभन फसवणुकीसाठीच असते. कमी कष्टात मिळणार्‍या मोठ्या फायद्याच्या योजना टाळा.

तक्रार नोंदवा

फसवणूक झाल्यास Pmë`mg https:/// cybercrime. gov. in/ या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवावी किंवा नजीकच्या सायबर पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.

बँक व्यवहारांवर लक्ष देणे गरजेचे

आपले बँक खाते नियमित तपासा. अनोळखी ट्रांजेक्शन आढळल्यास तत्काळ बँकेशी संपर्क साधा.

गोपनीय माहितीची मागणी

नागरिकांना खात्याचे तपशील, इंटरनेट बँकिंगचे पासवर्ड, मोबाईल क्रमांक, जढझ यांसारखी संवेदनशील माहिती शेअर करण्यास प्रवृत्त केले जाते. फसवणूक करणारे खात्याचे संपूर्ण नियंत्रण मिळवून आर्थिक व्यवहार करण्यास सुरुवात करतात.

गुन्हेगारीत बँक खात्यांचा वापर

बँक खाती मनी लॉन्डरिंग, फसवणुकीतून मिळालेल्या रकमेची देवाणघेवाण, तसेच बेकायदा व्यवहारांसाठी वापरली जातात.

खातेधारकाचा गुन्ह्यात थेट सहभाग नसतानाही त्याचे नाव तपास यंत्रणांच्या रडारवर येते, आणि त्याला चौकशीला सामोरे जावे लागते.

सायबर गुन्हेगार टेलिग्रामच्या मदतीने सहजतेने नागरिकांकडून बॅँक खाती मिळवत असल्याचे तपासात समोर येऊ लागले आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मोबदल्याच्या आमिषाला बळी पडू नका. आपले बँक खाते किंवा इतर गोपनीय माहिती कोणत्याही परिस्थितीत अनोळखी व्यक्तींना शेअर करू नका. फसवणुकीच्या घटनांमुळे सामान्य नागरिकांनादेखील अनावश्यक त्रास सहन करावा लागू शकतो.
रविवकिरण नाळे, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT