पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक दिवाळीच्या धामधुमीत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या शहर कार्यकारिणीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी पिंपळे निलख येथील रविराज काळे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रभारी प्रकाश जरवाल, प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष अजित फाटके पाटील, प्रदेश सचिव डॉ. अभिजित मोरे, सहसचिव अॅड. सागर पाटील यांनी काळे यांची नियुक्ती जाहीर केली. (Latest Pimpri News)
काळे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात व तरुणांच्या आंदोलनांमध्ये सक्रिय आहेत. ते आपचे युवक शहराध्यक्ष म्हणून शहरात सक्रिय होते.
आप सक्षम पर्याय म्हणून उभा राहील
आगामी काळात होणार्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीला सक्षम आणि पारदर्शक पर्याय म्हणून उभे करण्याचा त्यांचा कटाक्ष आहे. पक्षात नव्या चेहर्यांना वाव देणे, स्थानिक प्रश्नांवर प्रामाणिकपणे लढणे आणि प्रशासनाला उत्तरदायी बनवणे, या अजेंड्यावर पक्ष शहरात काम करेल. आप पिंपरी चिंचवडमध्ये नव्या उमेदीने आणि नवी ऊर्जा घेऊन काम करणार आहे, असे नवनिर्वाचित शहराध्यक्ष रविराज काळे यांनी सांगितले.