Chakan gita ruturaj jagdale dowry case Pudhari
पिंपरी चिंचवड

chakan dowry case: चाकणमध्ये विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल, कारच्या पाच लाखांसाठी सासरच्यांकडून छळ?

chakan todays crime news: पती ऋतुराज जगदाळे, सासू कल्पना जगदाळे, सासरे प्रल्हाद जगदाळे, नणंद ऋतुजा गव्हाणे अशी आरोपींची नावे

पुढारी डिजिटल टीम

Chakan Geeta Ruturaj Jagdale Dowry Death Case

तुषार झरेकर, पुढारी न्यूज

चाकण : पुणे जिल्ह्यातील चाकण येथे 24 वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत मृत्यूला कवटाळले. गीता ऋतुराज जगदाळे असे या विवाहितेचे नाव असून सासरच्यांनी छळ केल्यानेच गीताने टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.

वर्षभरात संसार उद्ध्वस्त

अवघ्या वर्षभरापूर्वी म्हणजेच 16 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या थाटामाटात गीताचा विवाह झाला होता. लग्नसोहळ्यात माहेरच्यांनी गीताला सोन्याचे दागिने होते. मात्र “हुंडा अपुरा दिला” या कारणावरून पती व सासरकडील मंडळींकडून तिचा छळ सुरू होता, अशी तक्रार तिचे वडील नारायण शेळकेंनी पोलिसांकडे दिली आहे. ज्या मुलीचं थाटामाटात लग्न लावून दिले तिने वर्षभरातच छळामुळे मृत्यूला कवटाळल्याने आईवडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

चौघांवर गुन्हा; तिघांना अटक

गीताच्या मृत्यूप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधात घरगुती हिंसाचार तसेच हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती ऋतुराज जगदाळे, सासू कल्पना जगदाळे, सासरे प्रल्हाद जगदाळे, नणंद ऋतुजा गव्हाणे अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी पती, सासू आणि सासरे यांना अटक केली आहे.

महिनाभरापूर्वी चुलत भावाच्या लग्नात ऋतुजाने आईवडिलांना काय सांगितले?

गीताचे वडील नारायण शेळके हे बीडचे असून ते शेती करतात. नारायण शेळके FIR मध्ये जबाब दिला आहे की, 10 फेब्रुवारी 2025 रोजी गीता चुलत भावाच्या लग्नासाठी गावी आली होती. यादरम्यान तिने सासरच्यांकडून छळ सुरू असल्याचे सांगितले. कारसाठी माहेरुन पाच लाख रुपये घेऊन ये, यासाठी पतीने तगादा लावल्याचे तिने आईवडिलांना सांगितले होते.

26 फेब्रुवारीला दुपारी फोन अन् रात्री जीवन संपवले

गीताने 26 फेब्रुवारी रोजी 11 वाजता आईला फोन केला होता. 'पती आणि सासरचे मला माहेरी निघून जा असं सांगतायंत', असे गीताने सांगितले होते. त्याच मध्यरात्री गीताने जीवन संपवले.

या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायदे अस्तित्वात असतानाही अशा घटना का घडतात, अंमलबजावणीत नेमक्या कुठे त्रुटी राहतात, असे प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहेत. गेल्या वर्षी पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या मृत्यूप्रकरणानंतर राज्यभरात हुंड्यासाठी होणारा छळ आणि त्यासंदर्भातील कायदे हा मुद्दा चर्चेत आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT