प्रातिनिधिक छायाचित्र File Photo
पिंपरी चिंचवड

'आज रात्री 9 वाजता नळकनेक्शन तोडण्यात येईल' अशा आशयाचे एसएमएस होत आहेत व्हायरल

लिंक, अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड न करता त्याकडे दुर्लक्ष करावे

पुढारी वृत्तसेवा

पाणीपट्टी थकीत आहे अशा मालमत्तेचे नळजोड तोडण्याची कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या माध्यमातून याबाबत नागरिकांना थकीत पाणीपट्टी भरण्याचे वेळोवेळी एसएमएसद्वारे व इतर माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. परंतु, शहरात नागरिकांचे आज रात्री 9 वाजता नळकनेक्शन तोडण्यात येईल, अशा आशयाचे बोगस एसएमएस पाठविण्यात आले आहेत.

देवेश जोशी, महापालिका अधिकारी या नावाने व 9309445824 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनपर फसवणूक करणारा ‘एसएमएस’ पाठविण्यात येत आहेत. असे एसएमएस हे नागरिकांची फसवणूक करणारे असून, याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे.

आर्थिक फसवणूक टाळावी. थकीत पाणीपट्टी भरण्याचे अधिकृत क्रमांक व सिस्टिमवरुन एसएमएस करण्यात येत आहेत. कोणत्याही मोबाईल क्रमाकांवरुन पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात येत नाही. नागरिकांनी अशा क्रमांकावरुन आलेल्या एसएमएसकडे दुर्लक्ष करून आर्थिक फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले आहे. तुमच्या माहितीमध्ये बदल आहेत. तुम्ही माहिती बदल करण्यासाठी अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठीचे व्हाट्सअपवर एसएमएस येत आहेत. या प्रकारच्या लिंक, अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड न करता त्याकडे दुर्लक्ष करावे. आपणास आपल्या माहितीबाबत, पाणीपट्टीबाबत कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास महापालिकेच्या 8888006666 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT