शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का; राष्ट्रवादी काँग्रेसच्या 37 माजी नगरसेवकांची घरवापसी Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Politics: शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का; राष्ट्रवादी काँग्रेसच्या 37 माजी नगरसेवकांची घरवापसी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: विधानसभा निवडणुकी वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे पक्षातून बाहेर पडत शरदचंद्र पवार पक्षात गेले होते. आता त्यांनी घरवापसी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्यासह 37 माजी नगरसेवक आणि 34 कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची साथ सोडत दादांचे घड्याळ हाती बांधले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे यांनी विधानसभा निवडणुकी वेळी अनेक माजी नगरसेवकांसोबत घेत वेगळी भूमिका घेत तुतारी हाती घेतली होती. भोसरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराविरोधात त्यांनी रान उठवले होते. (Latest Pimpri News)

मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गव्हाणे यांनी पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतमाजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनीदेखील प्रवेश केल्याने शहरात शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

या माजी नगरसेवकांची घरवापसी

घरवापसी करणार्‍यांमध्ये अजित गव्हाणे, वैशाली घोडेकर, राहुल भोसले, समीर मासुळकर, गीता मंचरकर, संजय वाबळे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, संगीता ताम्हाणे, रवींद्र सोनवणे, यश साने, विनया तापकीर, अनुराधा गोफणे, सुमन पवळे, संजय नेवाळे, वसंत बोराटे, भिमाबाई फुगे, सारिका लांडगे, हनुमंत भोसले, बबन बोराटे, विश्वनाथ लांडे, तानाजी खाडे, शशिकिरण गवळी, शुंभागी बोर्‍हाडे, वैशाली उबाळे, स्वाती साने, मंदा आल्हाट, शांता आल्हाट, घनश्याम खेडेकर, चंद्रकांत वाळके, जालिंदर शिंदे, विनायक रणसुभे, ईश्वर ठोंबरे, धनंजय भालेकर, निवृत्ती शिंदे, नंदू शिंदे यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT