Pimpri News: बलशाली महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न घेऊन राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे हातात घेतली आहेत. आधुनिक युगाशी स्पर्धा करीत महाराष्ट्र प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुती सरकार सक्षमपणे काम करील, असा विश्वास वाटतो, अशी प्रतिक्रिया शपथविधी सोहळ्यानंतर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.
आमदार लांडगे यांनी सांगितले, की भाजप-शिवसेना-एनसीपी-आरपीआय व मित्रपक्ष महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली आता महाराष्ट्र थांबणार नाही. प्रखर हिंदूत्व आणि विकासाच्या वाटेवर महाराष्ट्र राज्य भारत देशाला जागतिक महासत्ता घडविण्यासाठी मोलाचे योगदान देईल, यात शंका नाही.