पुढारी वृत्तसेवा : सरकारच्या कामकाजात नियमितपणा यावा ही नागरिकांची आणि आरोग्यमंत्री म्हणून माझी अपेक्षा आहे. एखादी गोष्ट योग्य व्हावी म्हणून ती सांगितली तर बिघडणार नाही. त्यामुळं आनंद व्यक्त करण्यापेक्षा नियमाप्रमाणे आणि लोकहिताचे व्हावी यासाठी प्रत्येकाने आग्रह केला पाहिजे., असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य प्रकाश आबिटकर यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर केले.
सांगवी येथील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिरात मंत्री आबिटकर उपस्थित होते. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी. फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
राज्याच्या आरोग्य विभागात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या निर्णयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना मंत्री आबिटकर म्हणाले की, कोणत्याही खात्याची चौकशी करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामध्ये काही गैर नाही. पारदर्शी कारभारासाठी चौकशीचे आदेश दिले असतील तर त्याचा आनंद व्यक्त करण्यात याचा प्रश्न नसून तो निर्णय स्वागतार्ह आहे.
मंत्री आबिटकर यांनी या शिबिराला भेट देऊन अशा प्रकारचे शिबिर घेणे गरजेचे असल्याचे नमूद केले. 0 ते 14 वयोगटाच्या मुलांच्या आरोग्य तपासणीचे होणार आहे. त्याचप्रमाणे येत्या काळात मुलींच्या आरोग्य संबंधित उपयोजना करण्यात येईल. त्याबाबतची कॅन्सरची लस दिल्यास त्यांना भविष्यामध्ये हे आजार बळवण्याची शक्यता कमी होईल. प्रत्येकाने लक्षात ठेवावे की पैसा मिळेल, पदहि मिळेल मात्र आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे