आळंदी: आळंदी परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा करत आरोपीला अटक केली आहे.या प्रकरणी विनायक तुकाराम भवारी (वय ३५, रा.सिन्नर, जि.नाशिक) याला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
केळगाव येथील ठाकरवाडी परिसरात गरुवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. संगीता दत्तात्रय गवारी या नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या पाळीसाठी गेल्या होत्या. त्यांच्या घरी सहा वर्षाची नात धनश्री सोनु केदारी आणि तिची देखभाल करणाऱ्या ७९ वर्षीय मंगल शिंदे य दोघीच होत्या.
याच संधीचा फायदा घेत आरोपीने घरात प्रवेश केला. गाढ झोपेत असलेल्या धनश्रीचा गळा आवळून खून करण्यात आला, तर मंगल शिंदे यांच्या डोक्यावर गंभीर वार करून त्यांची निर्घण हत्या करण्यात आली.
गुरुवारी सकाळी संगीता गवारी घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घरातील भीषण दृश्य पाहन त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले
घटनास्थळी पोहोचलेल्या आळंदी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि काही तासांतच संशयिताचा माग काढत आरोपी विनायक भवारी याला अटक केली.
पोलीस निरीक्षक एस. बी. नरके यांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी आणि तक्रारदार महिलेचे दोन वर्षापर्वी लग्न झाले होते. मात्र, कौटंबिक वादामुळे ते मागील एक महिन्यापासून वेगळे राहत होते. आरोपी वारंवार घरी येत असल्याने मंगल शिंदे त्याला जाब विचारत असत. तसेच लहानगी धनश्री देखील त्याला विरोध करत होती.
याच रागातन आरोपीने प्रथम मंगल शिंदे यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी धनश्रीने आरडाओरड केल्याने संतापाच्या भरात आरोपीने तिचाही गळा आवळून खून केला.या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकड्न पुढील तपास सरू आहे.