जिन्यातून फरफटत नेत ८५ वर्षीय वृद्धेवर बलात्कार. File Photo
पिंपरी चिंचवड

Pune Crime | पुणे जिल्हा हादरला! जिन्यातून फरफटत नेत ८५ वर्षीय वृद्धेवर बलात्कार

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

घरात पाहुणे आल्याने गप्पा सुरू होत्या. ८५ वर्षीय वृद्ध आई घराबाहेर चालत होती. त्या वेळी अचानक एका नराधम तरुणाने वृद्धेला फरफटत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. जखमी झालेली वृद्ध महिला जिन्यात विव्हळत होती. पाहुणे गेल्यानंतर घरातील मंडळी बाहेर आली. वृद्धेची शोधाशोध केली.

त्या वेळी महिलेला आपली आई जिन्यात जखमी अवस्थेत विव्हळत पडल्याचे दिसून आले. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. २३) म्हाळुंगे येथे उघडकीस आला. याप्रकरणी पीडित वृद्धेच्या ५७ वर्षीय मुलीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी ओम जयचंद पुरी (२३, सध्या रा. साखरेवस्ती, मूळ रा. धाराशिव) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इलेक्ट्रिशनचे काम करतो. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी पीडित वृद्ध महिला सोसायटीतील पाचव्या मजल्यावरील आपल्या फ्लॅट समोर चालत होती. त्या वेळी आरोपी सोसायटीमध्ये आला होता. पाचव्या मजल्यावर आला असता त्याने वृद्धेला पाहिले. त्यावेळी मजल्यावर कोणीही नसल्याचे त्याने पाहिले.

त्यानंतर त्याने वृद्धेवर झडप घालत तिचे तोंड दाबले. त्यानंतर जिन्यातून फरफटत सहाव्या व सातव्या मजल्याच्या जिन्यातील मोकळ्या जागेत नेऊन बलात्कार केला. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीला पाच दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पाऊण तास अत्याचार

आरोपीने बलात्कार करताना वृद्धेचा गळा दाबला. तसेच, वृद्धेला हाताने मारहाण केली. हा सर्व प्रकार तब्बल पाऊण तास सुरू होता. हा प्रकार सुरू असताना वृद्धा प्रतिकार तसेच आरडाओरडा करत होती. मात्र, तिच्या मदतीसाठी कोणीही आले नाही.

सीसीटीव्हीवरून आरोपीची ओळख

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. चार दिवसांपूर्वी हा आरोपी सोसायटीमध्ये काम करण्यासाठी आला होता. त्यानंतर सोमवारी हा आरोपी पुन्हा सोसायटीत आला. त्यानंतर त्याने हे घृणास्पद कृत्य केले. पोलिसांनी सोसायटीत जाऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्याद्वारे आरोपीची ओळख पटवली.

याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. 66 याब सीसीटीव्हीच्या आधारे काही तासांतच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घडलेला प्रकार अतिशय घृणास्पद आहे. नागरिकांनी आपल्या सोसायटीत येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करावी. सुरक्षारक्षकांनी अलर्ट राहणे गरेजेचे आहे.
कन्हैया थोरात, वरिष्ठ निरीक्षक, हिंजवडी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT