पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा, यासाठी मोठी कारवाई केली असून, केवळ जून महिन्यात 35 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कारवाईत तीन महिलांचाही समावेश आहे. जानेवारी ते जून या कालावधीत पोलिसांनी एकूण 111 गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही प्रतिबंधात्मक मोहीम राबवली जात आहे.
परिमंडळ एकअंतर्गत चिंचवड, सांगवी, दापोडी, निगडी पोलिस ठाण्यांमधील 15 सराईत गुन्हेगारांविरोधात कारवाई झाली. चिंचवडमधील सद्दाम मोहम्मद तांबोळी आणि सोहेल मोहम्मद तांबोळी हे सखे भाऊ, तसेच लखन ऊर्फ कार्तिक कैलास साठे, स्वप्नील ऊर्फ आब्या संतोष भोसले, आदित्य बाबू आवळे, श्रीनाथ अंकुश वाघमारे यांना तडीपार करण्यात आले. सांगवीतील रोहित डॅनिअल तोरणे, अभय विकास सुरवसे, अक्षय दशरथ शिंदे, दापोडीतील मंगेश अशोक यादव, समीर जयवंत खैरनार, निगडीतील सचिन ऊर्फ सुनील गायकवाड, अरमान ऊर्फ डायमंड मुन्ना खान, हृतिक अनिल जाधव आणि प्रसाद ऊर्फ लंब्या सुतार यांच्यावरही हद्दपारीची कारवाई झाली आहे.
दिघी पोलिस ठाण्यातून भरत अण्णासाहेब मुळे, आकाश सत्यवान तापकीर, प्रद्युम्न हिरामण पानसरे, प्रतीक नारायण पवार आणि महिला गुन्हेगार रेखा रादू हिरोत, प्रिया त्रिशूल कंजारभट यांना तडीपार करण्यात आले.
महाळुंगे एमआयडीसी येथून रामदास साळुंखे, प्रभू कोळी, दीपक खेंगले, तसेच महिला गुन्हेगार दर्शना राठोड, चाकण येथून महेंद्र ससाणे, किरण धनवटे, हनुमंत नायकोडी यांना हद्दपार करण्यात आले. चिखलीतील अक्षय जाधव, ऋषभ मांडके, घनश्याम यादव, अफजल मणियार, आळंदीतील जितेंद्र हल्ले साहू, मोरंती ऊर्फ मोरवती राजपूत आणि एमआयडीसी भोसरीतील अजय दुनघव यांच्यावर कारवाई करण्यात आली.