गृहप्रकल्पात सोलरद्वारे विजेची 30 टक्के बचत; जिल्ह्यातील पहिला प्रकल्प असल्याचा पीएमआरडीएचा दावा Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri: गृहप्रकल्पात सोलरद्वारे विजेची 30 टक्के बचत; जिल्ह्यातील पहिला प्रकल्प असल्याचा पीएमआरडीएचा दावा

45 इमारतींमध्ये सिस्टीम कार्यान्वित

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणअंतर्गत उभारण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांमध्ये सोलरद्वारे वीज जोडण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजना अंतर्गत असलेल्या या प्रकल्पामध्ये 30 टक्के वीज या माध्यमातून निर्माण होत आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या 45 इमारतींमध्ये नेट मीटरिंगद्वारे महावितरण या इमारतींना सवलत देत आहे. पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देणार्‍या या घरकुल वाटपामध्ये हा प्रकल्प पहिलाच असा दावा करण्यात आला आहे.

प्राधिकरणाच्या वतीने स्पाईन रस्त्यावरील भोसरी येथे सेक्टर 12 या ठिकाणी हे घरकुल उभारले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 45 इमारतीमध्ये जवळपास 4 हजार 883 सदनिका उभारण्यात आलेले आहेत. यात वन बीएचके 3317 तर, टू बीएचके 1566 आहेत.  (Latest Pimpri News)

दरम्यान, या सोसायटीमध्ये सदनिकेच्या घरासमोरील जागा, वाहनतळ आणि जिना या ठिकाणी ट्यूबलाइट आहेत. हे सर्व आता सोलर मीटरद्वारे जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण खर्चापैकी 30 टक्के बचत संबंधित सोसायटीची होत आहे. त्यामुळे दोन हजारांच्या आसपास येणार वीजबिल हे 700 ते 800 पर्यंत आलेले आहे.

प्रती इमारतीत 2 किलो वॅट क्षमतेची सिस्टीम

प्रत्येक इमारतीमध्ये 2 किलोवॅट वीज जनरेट होईल, अशी सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. याबाबत काही तक्रारी होत्या. मात्र, त्यातील तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर त्या सक्षमतेने सुरू करण्यात आल्या असून, संबंधित सर्व यंत्रणा पीएमआरडीएच्या आख्यारित सुरू असणार आहे. त्याबाबत विद्युत विभाग स्वतंत्र देखरेख ठेवत आहे.

प्रतिसदनिका 100 लिटर गरम पाणी

इमारतीत उभारण्यात आलेल्या या सोलर सिस्टिमद्वारे प्रत्येक सदनिकांमध्ये 100 लिटर पाणी मिळत आहे. त्यामुळे त्यातदेखील सदनिकाधारकांच्या विजेमध्ये मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. सद्यस्थितीत काही इमारतीमधील अद्याप सदनिकांमध्ये कोणी राहत नाही. त्यामुळे इतर सदस्यांना अधिक लिटर पाणी मिळत आहे.

सेक्टर 12 या गृहप्रकल्पातील पहिल्या टप्प्यात सर्व सोलर यंत्रणा कार्यान्वित झालेली आहेत. त्याचा फायदा सदनिकाधारकांना होत आहे. वीजबिलात 30 टक्क्यांहून अधिक बचत होत आहे.
- संजय पाटील, कार्यकारी अभियंता, पीएमआरडीए

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT