17 year old boy drowning incident
पिंपरी: मित्रांसोबत खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि. 9) दुपारी चिखली येथील शेलार वस्तीमधील खाणीतील पाण्यात त्याचा मृतदेह सापडला.
मृताचे नाव श्री मनोज चव्हाण (17, रा. तळवडे) असे आहे. सोमवारी दुपारी चार वाजता तो मित्रांसोबत शेलार वस्तीमधील खाणीत पोहण्यासाठी गेला होता. पोहताना तो पाण्यात बुडाला. हा प्रकार पाहून त्याचे मित्र घाबरले आणि घटनास्थळावरून निघून गेले. (Latest Pimpri News)
भीतीमुळे त्यांनी कोणालाही याची माहिती दिली नाही. दरम्यान, श्री याचा नातेवाईकांनी शोध सुरू केला असता मंगळवारी सकाळी मित्रांनी ही घटना उघड केली. त्यानंतर चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी दुपारी श्री याचा मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनासाठी त्याला महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.