पिंपरी : जीबीएस रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने शहरातील खासगी 10 रिव्हर्स ऑस्मोसिस पाणी प्रकल्पांवर शनिवारी (दि.8) कारवाई करत ते बंद केले. आरओ प्लांट्सचे सात एटीएमही बंद करण्यात आले आहेत.
महापालिकेतर्फे, खासगी आरओ प्लांटच्या पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये अनधिकृत खासगी आरओ वॉटर ऑपरेटर्स दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करून पुरवठा करत असल्याचे निदर्शनास आले होते.
महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालय पथकाने 2, ड क्षेत्रीय कार्यालयाने 2 आरओ प्लांट तर, 7 एटीएम आरओ प्लांट, ब क्षेत्रीय कार्यालयाने 1, ग क्षेत्रीय कार्यालयाने 4 आणि ह क्षेत्रीय कार्यालयाने 1 आरओ प्लांट कारवाई करीत बंद केला.
शहरातील नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाणी मिळावे, यासाठी अनधिकृतपणे दूषित पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या आरओ प्लांटवर कारवाई केली जात आहे, असे महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.