Latest

छत्रपती संभाजीनगर : योग्य पेट्रोल भरले का? आता मोजणे शक्य; युवकाने विकसित केली यंत्रणा

दिनेश चोरगे

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आपल्या दुचाकीत दिलेल्या पैशांएवढे पेट्रोल भरले का नाही याचे मोजमाप करणारी यंत्रणा कोणत्याही दुचाकीत उपलब्ध नाही. भरलेल्या पेट्रोलचे मोजमाप ग्राहक करू शकत नाहीत. याचा गैरफायदा काही पंपचालक घेत असतात. पंप चालकांकडून पेट्रोल भरताना होणाऱ्या फसवणुकीला आळा घालणारी डिजिटल यंत्रणा छत्रपती संभाजीनगरातील रोहित श्रीकांत पाटसकर या युवकाने विकसित केली आहे.

पंपांवर अनेकदा वाहनधारकांना कमी पेट्रोल मिळाल्याचा अनुभव येतो. पेट्रोल भरल्यानंतर काही अंतर कापताच ते संपून जाते. त्यामुळे पंपावर आपली फसवणूक झाल्याचे ग्राहकाच्या निदर्शनास येते. त्यातून त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. पेट्रोल कमी मिळाल्याच्या घटनांचे रूपांतर अनेकदा वादविवादात होते दुचाकीचालक व पंपावरील कर्मचाऱ्यांत हाणामारीचे प्रकारदेखील घडत असतात. पंप चालकाने आपण दिलेल्या रकमे एवढ्या इंधनाचा दुचाकीत भरणा केला का, याची मोजमाप करणारी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने ग्राहकांना निमूटपणे ही फसवणूक सहन करावी लागते. या समस्येवर पुण्याच्या व्हीआयटीमध्ये अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या रोहितने डिजिटल फ्युअल रीडरच्या रूपात उपाय शोधला आहे.

पेट्रोल टाकणाऱ्यालाच म्हणा, झीरो रीडिंग बघा

पंपावरील व्यक्ती आपणास पेट्रोल टाकण्यापूर्वी झीरो रीडिंग बघा, असा सल्ला देते. रोहितदेखील त्यांना त्याच्या डिजिटल फ्यूअल रीडर मीटरमध्ये झीरो रीडिंग बघण्यास सांगतो. हा प्रयोग साकारताना आलेल्या अडचणींवर प्रो. प्रमोद काळे यांनी रोहितला मार्गदर्शन केले. सुरुवातीला टाकीत सेन्सर बसविताना अडचणी आल्या. टाकीत विविध पद्धतींनी सेन्सर कसा बसविता येईल, तसेच पेट्रोलचे मोजमाप तंतोतत कसे घेता येईल. याबाबत प्रो. काळे यांनी मार्गदर्शन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT