Latest

पाचशे रुपये भरा, रात्र तुरुंगात काढा; उत्तराखंडमध्ये कारागृह पर्यटनाची योजना

दिनेश चोरगे

डेहराडून; वृत्तसंस्था :  तुरुंगाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ इच्छिणार्‍या पर्यटकांसाठी उत्तराखंडमधील हल्दवानी तुरुंग प्रशासनाने एक नामी उपाय शोधला आहे. त्यानुसार 500 रुपये देऊन तुरुंगात एक रात्र काढण्याची परवानगी तुरुंग प्रशासनाकडून दिली जात आहे.

या कारागृहाचे उपअधीक्षक सतीश सुखीजा यांनी सांगितले की, हल्दवानी कारागृह 1903 मध्ये बांधण्यात आले. याच्या काही भागांत अजूनही सहा कर्मचारी निवासस्थाने असून, ती दीर्घकाळापासून रिक्त आहेत. आता कारागृह प्रशासन नवीन योजना तयार करत आहे.
ते म्हणाले की, काही लोकांची नावे वरिष्ठ अधिकार्‍यांच्या वतीने तुरुंग प्रशासनाकडे सातत्याने पाठवली जात असून, त्यांना काही काळ तुरुंगाच्या बरॅकमध्ये घालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या लोकांना कैद्यांचे गणवेश दिले जातात आणि तुरुंगाच्या स्वयंपाकघरात शिजवलेले अन्नही दिले जाते. ही प्रक्रिया आता नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार आहे.

चक्क ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार

तुरुंग अधिकार्‍यांनी सांगितले की, असे अनेक लोक आहेत की, ज्यांच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहून त्यांना आयुष्यात एकदा तुरुंगात जावे लागेल, असा ज्योतिषांचा अंदाज असतो. अशा परिस्थितीत भविष्यात काही कारणाने तुरुंगात जाण्याची शक्यता कमी करण्यासाठी लोक स्वत:हून तुरुंगातच राहायला जातात. अशा लोकांसाठी तुरुंगाचा एक भाग तयार केला जात आहे. तिथे हे लोक 500 रुपयांमध्ये एक रात्र काढू शकतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT