पुढारी ऑनलाईन डेस्क : दिशाभूल करणार्या जाहिरांतीबाबत तुम्ही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेला माफीनामाचे मूळ रेकॉर्ड का दिले नाही? तुम्ही ई-फायलिंग का केले? हा संवादाचा खूप अभाव आहे. तुमचे वकील खूप हुशार आहेत. हे जाणूनबुजून करण्यात आले आहे, अशा शब्दांमध्ये खडसावत माफीनामा प्रसिद्ध केलेल्या वर्तमानपत्रांची मुख्य प्रत जमा करा, असा आदेश आज (दि. ३० एप्रिल) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने दिला.
पतंजली आयुर्वेदाच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या 'आयएमए'च्या याचिकेवर आज (पुन्हा सुनावणी झाली. यावेळी बाबा रामदेव आणि पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण न्यायालयात उपस्थित होते. दिशाभूल करणार्या जाहिरांतीबाबत माफीनामा प्रसिद्ध केलेल्या वर्तमानपत्रांची मुख्य प्रत जमा करा, असा आदेश न्यायालयाने दिला. तसेच योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना पुढील सुनावणीसाठी वैयक्तिक हजर राहण्यापासून न्यायालयाने सूट दिली आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत रामदेव बाबांचे वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, आम्ही माफीनामा पत्र कागदात रजिस्ट्रीमध्ये जमा केले होते. पेपरमध्ये प्रसिद्ध झालेले माफीपत्र मुकुलने न्यायालयात दाखवले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने .िविचारणा केली की, तुम्ही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेला माफीनामाचे मूळ रेकॉर्ड का दिले नाही? तुम्ही ई-फायलिंग का केले?हा संवादाचा खूप अभाव आहे. तुमचे वकील खूप हुशार आहेत. हे जाणूनबुजून करण्यात आले आहे, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने खडसावले. पुढील सुनावणीत रामदेव आणि बाळकृष्ण यांना हजर राहण्यापासून सूट देण्याची विनंती केली. फक्त पुढील सुनावणीसाठी ही सूट राहिल, असे असे न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
यापूर्वी 23 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पतंजली आयुर्वेदाने वृत्तपत्रात दिलेली जाहीर माफी नाकारली होती. ज्या आकारात पतंजली आयुर्वेदाने जाहिरात छापली होती त्याच आकारात माफीनामा पत्र छापले आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली होती. दरम्यान, सोमवारी (29 एप्रिल) पतंजली आयुर्वेद लिमिटेड आणि दिव्या फार्मसीच्या 14 उत्पादनांचे उत्पादन परवाने उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणाने रद्द केला आहे.
हेही वाचा :