कुस्तीपटू अमन सेहरावतने गुरुवारी 57 किलो वजनी गटाच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. Twitter
Olympics

कुस्तीत अमन सेहरावतने पदकाची आशा जागविली! भारताची सेमीफायनलमध्ये धडक

Paris Olympics 2024 : अलबेनियाच्या कुस्तीपटूला दाखवले आस्मान

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Paris Olympics 2024 Wrestler Aman Sehrawat : पॅरिस ऑलिम्पिकमधील पुरुषांच्या कुस्ती इव्हेंटमध्ये भारताचा पदकाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कुस्तीपटू अमन सेहरावतने गुरुवारी पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. त्याने क्वार्टर फायनलमध्ये अलबेनियाच्या झेलीमखान अबाकारोव याचा 11-0 ने पराभव करून भारताचे कुस्तीमधील आव्हान कायम ठेवले आहे. सेमीफायनलचा सामना आज रात्री 9.45 वाजता जपानच्या कुस्तीपटू विरुद्ध रंगणार आहे.

अमनने सुरुवातीपासूनच आक्रमण केले. दुसरीकडे, झेलीमखान बचावात्मक पवित्रा घेताना दिसला. अलबेनियन कुस्तीपटूच्या निष्क्रियतेचा फायदा अमनला मिळाला. त्याने एक गुणाची आघाडी घेतली. त्यानंतर अमनने दोन गुणांची बाजी मारली आणि 3-0 अशी आघाडी मिळवली. पहिल्या फेरीत ही आघाडी कायम राहिली.

दुसऱ्या फेरीत अमनने मुसंडी मारली ​​आणि दुसऱ्याच मिनिटाला झेलीमखानला खाली लोळवले. झेलीमखानच्या पायांची मोळी बांधून त्याला तीनदा उलटसुलट फिरवले. अशा प्रकारे अमनच्या खात्यात थेट 8 गुण आले. यासह त्याची आघाडी 11-0 अशी झाली. यानंतर अल्बेनियाच्या कुस्तीपटूने रिव्ह्यू घेतला, जो रेफरींनी चुकीचा ठरला. ज्यामुळे भारताच्या खात्यात आणखी एक गुण जमा झाला. अशा प्रकारे अमनने 12-0ने ही लढत जिंकली आणि सेमीफायनलमध्ये जागा पक्की केली.

अमनची राउंड 16 मध्ये चमक

राउंड 16 मध्ये अमन सेहरावत समोर नॉर्थ मॅसेडोनियाच्या व्लादिमीर एगोरोव्हचे आव्हान होते. या सामन्यात चुरशीची स्पर्धा अपेक्षित होती, पण भारतीय कुस्तीपटूचे इरादे वेगळेच होते. अमन सेहरावतने चमकदार कामगिरी करत अतिशय झटपट गुण मिळवले. 10-0 अशी आघाडी होताच रेफरीने सामना थांबवून अमन सेहरावतला विजयी घोषित केले. यासह त्याने पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली.

अंशू मलिक ‘प्री क्वार्टर’मध्ये पराभूत

महिलांच्या 57 किलो वजनी गटात अंशू मलिकला प्री-क्वार्टर फायनलमध्ये अमेरिकेच्या हेलन लुईस मारोलिसकडून 7-2 ने पराभव पत्करावा लागला. हेलनने सुरुवातीपासूनच अंशूवर दडपण ठेवले होते. अंशू कमबॅक करण्यात अपयशी ठरली. अखेरीस अमेरिकन कुस्तीपटूने विजयावर शिक्कामोर्तब केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT