पुढारी ऑनलाईन डेस्क : आपचे खासदार राघव चड्ढा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा दोघेही मुंबई विमानतळावर दिसले. (Parineeti Chopra ) या दरम्यान मीडियाने तिला लग्नाबद्दल प्रश्न विचारले, तेव्हा ती हसताना दिसली. उत्तरादाखल परिणीतीची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. मीडियाने विचारलं की, 'मॅम जी जी बातमी येत आहे, ती कन्फर्म आहे का?' परिणीतीने या प्रश्नाचे उत्तर उघडपणे तर दिली नाही. पण, तिचं मौन आणि हास्य सर्व काही सांगून गेलं. (Parineeti Chopra )
याविषयी आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्विट करून शिक्कामोर्तब केल आहे. ट्विटमध्ये संजीव अरोरा म्हणाले- 'राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हा दोघांचं नातं प्रेम, आनंद आणि सहवासाने भरलेलं असावं. माझ्या खूप शुभेच्छा' (Parineeti Chopra)
राघव आणि परिणीती हे दोघेही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतले आहे. रिपोर्टनुसार, कुटुंबियांनी लग्नाबद्दल बोलणी सुरू केल्याची चर्चा आहे. दोन्ही कुटूंब एकमेकांच्या संपर्कात आहेत. परिणीती आणि राघव यांच्या कुटुंबियांनी लग्नाबाबत चर्चा सुरू केली आहेत. लवकरच साखरपुड्याबाबतच्या तारखेची घोषणा केली जाईल, असे म्हटले जात आहे. पण हा कार्यक्रम खासगी करण्याचे प्रस्तावित असल्याचे समजते.