परभणी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वाडीदमई ग्रामपंचायतीच्या निकालानंतर विजयी झालेल्या गटाकडून प्रतिस्पर्धी गटावर दगडफेक करीत लाठाकाठ्यांनी मारहाणीचा प्रकार घडला. या हाणामारीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. आज (दि.२०) पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
परभणी शहरातील जायकवाडी वसाहतीतील कल्याण मंडपम कार्यालयात मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत मतमोजणीस सुरूवात झाली होती. त्यामुळे या परिसरातील वसाहतींमध्ये कार्यकर्ते ठाण मांडून होते. मुख्य कारेगाव रस्त्यावरही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. तालुक्यातील वाडीदमई ग्रामपंचायतीचा निकाल लागल्यानंतर विजयी गटाने जोरदार जल्लोष करीत या भागातील नेते अॅड.स्वराजसिंह परिहार यांच्या निवासस्थानासमोर उभे असलेल्या प्रतिस्पर्धी गटाला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर लाठाकाठ्यांनी मारहाण करत दगडफेक केली. यामध्ये दोघेजण जखमी झाले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन जमावास पांगवले.
हेही वाचा :