file photo 
Latest

Papua New Guinea Earthquake : पापुआ न्यू गिनीमध्ये ६.७ रिश्टर स्केलचा भूकंप

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : पापुआ न्यू गिनीमध्ये ६.७ रिश्टर स्केलचा भूकंप. भूकंपाची खोली 53 किलोमीटर (33 मैल) होती. त्याचा केंद्रबिंदू मदंगच्या किनारपट्टीच्या शहराच्या आग्नेय ५६ किलोमीटर अंतरावर होता. पापुआ न्यू गिनीच्या पूर्वेकडील भागात शनिवारी ६.७ तीव्रतेचा भूकंप झाला, असे युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने म्हटले आहे. कोणतीही जिवीत आणि वित्तीय हानी नसल्याचे स्पष्ट झालेले नाही. (Papua New Guinea Earthquake)

आज (दि,७) पापुआ न्यू गिनीच्या पूर्वेकडील भागात ६.७ तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर काही मिनिटांच्या अवधीनंतर मदांगच्या किनाऱ्यावर समान तीव्रतेचा धक्का बसला, असे USGS ने सांगितले. पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंप वारंवार होत असतात. तिथे क्वचितच मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. प्रमुख शहरे आणि शहरांच्या बाहेर, बहुतेक भाग विरळ लोकवस्तीचे आहेत आणि तेथे इमारती लाकडापासून बनविल्या जातात. पण काही भूकंप जास्त विध्वंसक असतात.

एप्रिलमध्ये झालेल्या पॅसिफिक बेट राष्ट्राच्या जंगलात असलेल्या ७.० तीव्रतेच्या भूकंपात सात लोक ठार झाले होते. भूकंपाच्या केंद्राजवळील कारवारी भागात सुमारे १८० घरे उद्ध्वस्त झाली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, ७.६-रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे शेकडो घरे, रस्ते उद्धवस्त झाले होते.  १० लोकांचा मृत्यू झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT