Latest

थरार! कारवाईला गेले आणि जुगाऱ्यावरच चढवली गाडी…!

backup backup

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पनवेल शहर पोलिसांच्या वाहनाने एका व्यक्तीला उडवल्याची धक्कादायक घटना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेत पोलीस वाहनाच्या धडकेत जुगारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पनवेलमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यासोबत या पोलीस वाहनाने जवळच असलेली संरक्षक भिंत पाडली आहे.

पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शासकीय अद्यापन महाविद्यालयाच्या आवारात 4 ते 5 मुले जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान पोलीस डायल नं.112 (वाहन क्रं. MH-12 एस क्यू -1982) ही पेट्रोलिंगसाठी फिरत असलेली गाडी घटनास्थळी पोहोचली. पोलीस वाहन पाहून ही मुले पळू लागली. पोलीस वाहन या मुलांचा पाठलाग करत होते. यासाठी पोलीस वाहन चालकाने वेग देखील वाढवला. धावत सुटलेल्या मुलांपैकी एक मुलगा शेजारी असलेल्या संरक्षक भीतीवर चढण्याचा प्रयत्न करत होता.  याच दरम्यान पोलीस वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन थेट भिंतीवर चढणाऱ्या मुलाच्या अंगावर गेले. मुलाला पोलीस वाहनाची बसलेली धडक इतकी भयानक होती की, या वाहनाच्या धडकेमुळे भिंतदेखील पडली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना घडताच जखमी युवकाला उचलून जवळील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले, मात्र याच वेळी जमाव आणि पोलिसांमध्ये वादावादी झाल्याची घटना घडली आहे. सध्या या जखमी युवकावर गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अशोक मंजुळे वय 25 राहणार इंदिरा नगर झोपडपट्टी असे जखमी युवकाचे नाव आहे.

फिल्मी स्टाईलने कारवाई

सिनेमात शोभेल अश्या पद्धतीने कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना ही कारवाईच अंगलट आली आहे. जुगारी पळू लागल्याने जुगाराच्या मागे पोलीस वॅन जुगाराच्या मागे पळाली आणि एका जुगाऱ्याला पकडण्यासाठी गाडीच अंगावर घातली. यात जुगारी चिरडला गेला आणि जखमी झाला.

गाडीचा अतिवेग ठरला धोकादायक

जुगार मुले जुगार खेळत असल्याचे दिसल्यानंतर, पोलीस वॅन चालकाने गाडीचा वेग वाढवला आणि जुगाऱ्यापर्यत पोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी वरील नियंत्रण सुटले आणि गाडी एका जुगाऱ्याच्या अंगावर चढली आणि त्याच्या मागे असलेल्या भीतीला जाऊन धडकली आणि ही भीत देखील पडली यात तो 25 वर्षीय जुगारी अशोक मंजुळे गंभीर जखमी झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT