पाथर्डी, पुढारी वृत्तसेवा: माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून डावले जाते अशी भावना त्यांच्या समर्थकांत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे यांना उमेदवारी न दिल्याने पाथर्डी येथील पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी रोगर हे किटकनाशक औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गर्जे याना उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पुढचा धोका पाहता त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
https://youtu.be/IYYU1mogoqk