पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या भूमिकेतील 'ओह माय गॉड 2' चित्रपट सध्या मोठी कमाई करत आहे. मात्र, पंकज त्रिपाठी यांचे वडिल बनारसी तिवारी यांचे निधन झाल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता पंकज त्रिपाठीचे वडील बनारसी तिवारी यांचे सोमवारी (दि.२१) निधन झाले. बनारसी तिवारी यांनी गोपाळगंजमधील बेलसंड येथे अखेरचा श्वास घेतला. पंकज यांनी वडिलांच्या तिवारीच्या जागी त्रिपाठी हे नाव लावले होते. (Pankaj Tripathi)
पंकज त्रिपाठी यांचे वडील बनारसी तिवारी हे ९८ वर्षांचे होते. ते सरकारी शिक्षक होते आणि प्राचार्य म्हणून निवृत्त झाले होते. ते सध्या गोपालगंजमध्ये पत्नीसोबत राहत होते. पंकज त्रिपाठी रात्री १० वाजेपर्यंत गोपालगंजमधील त्यांच्या गावात पोहोचतील आणि मंगळवारी गावातूनच अंत्यसंस्कार करण्यात येतील. (Pankaj Tripathi)
पंकजचे वडील बनारस त्रिपाठी यांचे त्यांच्या मूळ गावी बलसंद येथे निधन झाले. पंकज त्रिपाठी यांचे वडील बनारस त्रिपाठी वयोमानानुसार आजाराने त्रस्त होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पंकज त्रिपाठी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी बनारस त्रिपाठी यांच्या मृत्यूबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. (Pankaj Tripathi)