Latest

Perth Test : पर्थ कसोटीत पाकिस्तान पराभवाच्या छायेत, ऑस्ट्रेलियाची पकड मजबूत

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानविरुद्धच्या पर्थ कसोटीत (Perth Test) ऑस्ट्रेलियाने आपली पकड मजबूत केली आहे. यजमान कांगारूंनी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 300 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 487 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ तिसऱ्या दिवशी 271 धावांतच गारद झाला. ज्यामुळे त्यांना फॉलोऑन टाळता आला नाही. पण ऑस्ट्रेलियानेही फॉलोऑन दिला नाही आणि दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 84 धावा केल्या.

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या 2 बद 132 धावा होती. पॅट कमिन्सच्या पहिल्याच षटकात नाईट वॉचमन खुर्रम शहजादने (7) विकेट गमावली. यानंतर बाबर आणि इमाम उल हक यांनी धुरा सांभाळली. पहिल्या सत्रात बाबर आणि इमाम ऑस्ट्रेलियाला आणखी यश मिळवू देणार नाहीत, असे वाटत असतानाच मार्शने आपली जादू दाखवली. त्याने 17 षटकांत बाबरला (21) यष्टिरक्षकाकडे झेलबाद करून ही जोडी तोडली. बाबर आणि इमाममध्ये 48 धावांची भागीदारी झाली. (perth test pakistan vs australia)

यानंतर ऑफस्पिनर नॅथन लायनने इमामला (199 चेंडूत 62 धावा) आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. विकेटकीपर अॅलेक्स कॅरीने त्याला यष्टिचित केले. इमामचे कसोटी क्रिकेटमधील हे नववे अर्धशतक ठरले. त्यानंतर वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सर्फराज अहमदला (3) बोल्ड केले आणि डावातील त्याची दुसरी विकेट घेतली. (perth test pakistan vs australia)

पाकिस्तानने 14 धावांमध्ये तीन विकेट गमावल्या. उपाहारापर्यंत त्यांची अवस्था सहा विकेटवर 203 धावा अशी झाली. उपाहारानंतर हेझलवूडने आपल्या बाउन्सरवर सौद शकीलला (28) स्लिपमध्ये वॉर्नरकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर कमिन्सने फहीम अश्रफला (9) स्लिपमध्ये ख्वाजा करवी झेलबाद, तर केरीने आमेर जमालला (10) लियॉनच्या गोलंदाजीवर यष्टीचित केले. ट्रॅव्हिस हेडने शाहीन शाह आफ्रिदीला मिडऑनला ख्वाजाच्या हाती झेलबाद करून पालिस्तानचा डाव संपवला. आघा सलमान २८ धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू नॅथन लायनने पहिल्या डावात सर्वाधिक 3 बळी घेतले. कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कने 2-2 विकेट घेतल्या. जोश हेझलवूड, मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.

स्मिथ आणि ख्वाजाने कांगारूंना सावरले

पाकिस्तानला स्वस्तात ऑलआउट करून कांगारूंनी 216 धावांची आघाडी घेतली. यानंतर यजमान संघाने फॉलोऑन न देत फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. वॉर्नर शून्यावर बाद झाला आणि लॅबुशेनही 2 धावा करून तंबूत परतला. या दोन्ही विकेट खुर्रम शहजादने घेतल्या. अशा स्थितीत पाकिस्तान सामन्यात कमबॅक करणार असे वाटत होते. पण स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा यांनी त्यांचे मनसुबे उधळले. दोघांनी संघाचा धावफलक हलता ठेवला आणि अर्धशतकी भागीदारी केली. दिवसाचा खेळ संपला ख्वाजा नाबाद 34 आणि स्मिथ नाबाद 43 धावांवर माघारी परतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT