Latest

देशातील असंतुष्‍ट नेत्‍यांचे दहशतवादी संघटनांशी संबंध! : पाकिस्‍तानचा ‘कबुल’नामा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ब्रिटन आणि अन्‍य देशांमध्‍ये आश्रय मागणार्‍या काही असंतुष्‍ट राजकीय नेत्‍यांचे ( Pakistan political leader) देशातील दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याची कबुली पाकिस्‍तानने अधिकृतरित्‍या दिली आहे. परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज जेहरा बलोच यांनी गुरुवारी (दि. ७ डिसेंबर) पत्रकार परिषदेत हा कबुलीनामा दिला. तुरुंगात डांबलेले पंतप्रधान इम्रान खान यांच्या सहाय्यकावर झालेल्या कथित अॅसिड हल्ल्याच्या प्रश्नावर त्‍या उत्तर देत होत्‍या.

akistan political leader : अनेकांचे दहशतवादी संघटनांशी संबंध

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे नेते आणि पंतप्रधानांचे माजी विशेष सहाय्यक मिर्झा शहजाद अकबर यांनी गेल्या आठवड्यात दावा केला होता की, ब्रिटनमध्‍ये त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. हल्‍लेखोरांनी घरावर ॲसिड फेकले होते. याबाबत विचारलेल्‍या प्रश्‍नाला उत्तर देताना परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्या मुमताज जेहरा बलोच म्‍हणाल्‍या की,  "अशा प्रकारच्‍या हल्ल्यात पाकिस्तानचा आणि पाकिस्तानी एजन्सीच्या सहभाग नाही. परदेशात आमच्या स्वतःच्या नागरिकांना लक्ष्य करण्याचे आमचे धोरण नाही. तथापि, अनेक राजकीय असंतुष्टांनी राजकीय आश्रय घेतला आहे. ते अनेक दशकांपासून ब्रिटन आणि जगभरातील इतर देशांमध्ये राहत आहेत. त्यांच्यापैकी अनेकांचे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत."

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT