Latest

Fungal Diseases : ५.७२ कोटी भारतीय बुरशीजन्य आजारांनी ग्रस्त; फंगल इन्फेक्शन कॅन्सरहून घातक

अमृता चौगुले

कोलकाता/नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमधील कल्याणी एम्स, दिल्ली एम्स, चंदीगडमधील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (पीजीआयएमईआर) तसेच ब्रिटनमधील मॅन्चेस्टर विद्यापीठातील वैज्ञानिकांनी केलेल्या एका संशोधनाअंती भारतात दरवर्षी क्षयरोगाहून (टीबी) 10 पटीने अधिक लोकांना बुरशीजन्य आजार (फंगल डिसिज) होत आहेत. आजघडीला भारतात 5.72 कोटी लोकांना गंभीर बुरशीजन्य आजार आहेत. मशरूम (भूछत्र), यिस्ट आणि मोल्डच्या स्वरूपात फंगल (बुरशी) हा मायक्रोऑर्गेनिझम आपल्या सर्वांच्याच आसपास अस्तित्वात असतो. ज्याप्रमाणे जीवाणू आणि विषाणूंमुळे काही आजार होतात, त्याप्रमाणेच बुरशीमुळेही काही आजार होतात. महत्त्वाचे म्हणजे फंगल इन्फेक्शन मेंदू, फुफ्फुसापर्यंत जाऊन कॉम्प्लिकेटेड बनले, तर ते कॅन्सरपेक्षाही घातक ठरू शकते. (Fungal Diseases)

सामान्य बुरशीजन्य आजार कोणते? (Fungal Diseases)

टीनिया कॉर्पोरिस (रिंगवर्म) : अंगावर गोलाकार चट्टे – टीनिया पेडिस (थेलीट फूट) : पायाच्या बोटांवर व्रण. टीनिया क्रूरिस : (जोक इच) घाम येतो अशा जागांवर उदा. काखेत, प्रायव्हेट पार्टलगत होतो. टीनिया अनग्युअम : (ओंमायकोसिस) -बहुतांश पायाच्या नखांपासून सुरुवात होते. – नखाचा रंग बिघडतो. – बुरशीची सुरुवात कोठूनही झाली तरी हळूहळू ती सर्वांगावर पसरते.

हे लक्षात घ्या

  • बुरशीला हवेतील आर्द्रता, प्रदूषण पूरक ठरते.
  • नाक, कान, सायनसमधील फंगस नर्व्हस सिस्टीमपर्यंत पोहोचू शकते.
  • कोरोना काळात ब्लॅक फंगस नाकातून मेंदूत पोहोचते.
  • नर्व्हस सिस्टीममध्ये इन्फेक्शन गेल्यास मेंदूज्वर होतो.
  • केसांतील कोंडाही फंगल इन्फेक्शनचाच प्रकार आहे.
  • डोळ्यांत, फुफ्फुसातही फंगल इन्फेक्शन होऊ शकते. (Fungal Diseases)

भारतात किती लोकांना कोणते इन्फेक्शन?

  • 2.4 कोटी महिलांना खासगी भागात इन्फेक्शन
  • 17.38 लाख लोकांना क्रोनिक एस्परगिलोसिस
  • 35 लाख लोकांना गंभीर लर्जीक लंग्ज मोड डिसिज
  • 2.5 लाख लोकांना सायनस, लंग्जमध्ये इन्फेक्शन
  • 10 लाख लोकांना डोळ्यांत घातक असे इन्फेक्शन (Fungal Diseases)

या गोष्टी आवर्जून करा

  • स्वच्छता राखा.
  • रोगप्रतिबंधक क्षमता मजबूत ठेवा.
  • सुका मेवा विशेषत: अक्रोड सेवन करा.
  • नियमित हलका व्यायाम करा.
  • नखे वाढवू नका.
  • कपडे दररोज धुतलेले वापरा
  • अंतर्वस्त्रे, मोजे, रुमाल रोज स्वच्छ धुतलेले वापरा.
  • दुसर्‍यांचा कंगवा, रुमाल वापरू नका.

यांना धोका अधिक

  • कमकुवत रोगप्रतिबंधक शक्ती असलेले लोक
  • मधुमेह रुग्ण
  • अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अलीकडेच केलेले
  • पाण्यात काम करणारे लोक
  • एचआयव्हीबाधित
  • मुले आणि वयोवृद्ध

इन्फेक्शनची ही मजल जीवघेणी

  • फंगल मेनिंजायटिस
  • ब्लॅक फंगस
  • लंग्ज फंगल इन्फेक्शन (हिस्टोप्लास्मोसिस)
  • सायनस फंगल इन्फेक्शन (फंगल सायनोसायटिस)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT