नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
आम्ही सरकार मध्ये आहोत, त्यामुळे जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा आम्हाला एक जागा मिळावी. 2012 पासून आम्ही भाजपसोबत आहोत, त्यामुळे आम्हाला संधी मिळाली पाहिजे. माझ्या पाठीमागे देशातील लोक आहे, महाराष्ट्राचा विचार केला तर गावागावात माझ्या कार्यकर्त्यांचा लोकांशी संपर्क आहे. आरपीआय मधील माझा गट सक्रिय आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले पाहीजे अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.
रामदास आठवले नाशिकमध्ये आहेत. पत्रकारपरिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवले म्हणाले, वास्तविक आम्हाला पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळेस संधी मिळायला पाहिजे होती, पण सुरवातीला छोटं मंत्रिमंडळ करायचे आहे, विस्तारावेळी तुमचा विचार करु असे मला सांगण्यात आले. त्याला आता आता वर्षे उलटले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लवकर करा त्यात आम्हाला संधी द्या असे आठवले म्हणाले.
आमच्या सोबत एकनाथ शिंदे आहेतच शिवाय आता अजित दादा आमच्यासोबत आल्याने आमची ताकद वाढली आहे. केवळ आता काँग्रेस सोबत येणं बाकी असल्याचे आठवले म्हणाले. आम्ही शरद पवार यांचा आदर करतो, मात्र अजित पवार यांचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे आठवले यावेळी म्हणाले.