Latest

BJP Meeting : सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये संघटनात्मक बदलाचे वारे! पंतप्रधानांच्या निवासस्थानी भाजप श्रेष्ठींची खलबत

backup backup

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशातील काही राज्यांमध्ये होवू घातलेल्या विधानसभा आणि सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षात संघटनात्मक बदलाचे वारे वाहत असल्याची चर्चा आहेे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजप पक्षश्रेष्ठींसोबतच्या बैठकीनंतर चर्चेला बळ मिळाले आहे.बुधवारी रात्री उशिरापर्यंत ७, लोकककल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांनी संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. पंतप्रधानाच्या उपस्थित झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, संघटनमंत्री बी.एल.संतोष यांच्यासह इतर महत्वाचे नेते उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.

देशातील राजकीय स्थिती आणि राजकीय मुद्दयांसंबंधी शहा,नड्डा आणि बी.एल.संतोष सातत्याने बैठका घेत आहे.त्याअनुषंगाने पंतप्रधानांसोबत च्या बैठकीत महत्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.या बैठकीत राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड सह इतर राज्यांमध्ये होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीसह लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या रणनीती संबंधी चर्चा झाल्याचे कळते. निवडणुकांच्या पूर्वी पक्षात संघटनात्मक तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता आहे. कर्नाटक-गुजरात सह तीन राज्यात नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्तीची शक्यता आहे.केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच भूपेंद्र यादव यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता देखील बैठकीनंतर वर्तवली जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कामकाजाच्या दृष्टीने भाजप विभागनिहाय रणनीती आखणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या संघटनात्मक रचनेनूसार देशाच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्व भागात येत्या ६ ते ८ जुलै दरम्यान नड्डा संघटनमंत्र्यांच्या उपस्थितीत विभागातील प्रमुख नेत्यांच्या बैठका घेतील. ६ जुलैला पूर्व, ७ जुलैला उत्तर आणि ८ जुलैला दक्षिण विभागाची बैठक बोलावण्यात आल्याचे कळते.

६ जुलैला गुवाहाटीत होणाऱ्या बैठकीत बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, नागालॅन्ड, मणिपूर, मिझोरम, मेघालय, त्रिपुरातील भाजप नेते सहभागी होती. दिल्लीत ७ जुलैला जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, पंजाब, चंदीगड, राजस्थान, गुजरात, दमन-दीव-दादरा-नगर-हवेली, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, उत्तराखंड, दिल्ली आणि हरियाणाचे भाजप नेते सहभागी होती.तर, केरळ, तामिळनाडू, पाॅन्डेचेरी, कर्नाटक, तेलंगणा, आंधप्रदेश, महाराष्ट्र, मुंबई, गोवा, अंदमान-निकोबार, लक्षद्वीप च्या नेत्यांची बैठक ८ जुलैला हैदराबाद येथे होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT