Latest

खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची: अंबादास दानवे

अमृता चौगुले

लोणावळा : खरी शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची आहे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले. लोणावळ्यात मंगळवारी अंबादास दानवे यांनी लोणावळा शिवसेना संपर्क कार्यालयाला भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला. या वेळी शिवसेना माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर, गटनेत्या शादान चौधरी, तालुका उपप्रमुख आशिष ठोंबरे, सुरेश गायकवाड, शांताराम भोते आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

गद्दारांना जनताच धडा शिकवेल

अंबादास दानवे म्हणाले, की ज्यांना गल्लीतील कुत्रंदेखील विचारत नव्हतं, त्यांना शिवसेनेनं मोठं केलं. काल अब्दुल सत्तार म्हणाले, मला कुत्रा चिन्ह दिलं तरी मी निवडून येईल. यावर दानवे म्हणाले, की कुत्रादेखील प्रामाणिक असतो, तुम्ही गद्दार आहात. जनता तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

शिवसेना कडवट शिवसैनिकांची

शिवसेना चाळीस गद्दारांची नाही तर कडवट शिवसैनिकांची आहे. न्यायालयाचा निकाल येऊ द्या, मग बघू; असे काही जण म्हणत आहेत; पण काय व्हायचं ते होऊ दे आपण बाळासाहेबांच्या विचारांसोबत रहायचे. चिन्ह, निशाणी या विषयात जाऊ नका.

बूथ स्तरावर जाऊन संघटनेचे काम करा

संघटनेचे काम बूथ स्तरावर जाऊन करा. सरकार जेथे चुकेल तेथे रस्त्यावर उतरा. पूर्वी तलवार घेऊन शिवसैनिक फिरत होते. आता शब्द हिच तलवार आहे. त्या वेळी परिस्थिती तशी होती. तेव्हा दगडांना शिवसेनाप्रमुखांनी घडविले आहे. आता लोकं म्हणतात पूर्वीची शिवसेना राहिली नाही, मग आता काय हातात तलवारी घेऊन ज्यांना घडविले त्यांच्यावर हातोडे घालायचे का? आता संघर्ष आचार, विचाराची तलावर घेऊन लढायचे आहे. तुम्ही जिंकू शकता हा संकल्प करा, असे आवाहन दानवे यांनी शिवसैनिकांना केले.

अडचणीतसोबत असलेलाच खरा शिवसैनिक

अडचणीच्या काळात जो शिवसेनेसोबत आहे तोच खरा शिवसैनिक, असे कार्यकर्त्यांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, की आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. पक्षचिन्ह कोणाला मिळणार, या विषयात तुम्ही पडू नका. बाळासाहेबांचे विचार व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. शिवसेना कोणाची आहे हे जगाला माहिती आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT