Emma Stone  
Latest

Oscars मध्ये पुरस्कार घेताना Oops मोमेंट! Emma Stone चा ड्रेस फाटला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : Oscars २०२४ मध्ये हॉलीवूड अभिनेत्री Emma Stone ने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब आपल्या नावे केला आहे. हा तिच्या करिअरमधील दुसरा ऑस्कर आहे. ९६ व्या पुरस्कारात एमाला पुअर थिंग्स (Poor Things) साठी सन्मानित केलं गेलं. पण, पुरस्कार घेताना तिला Oops मोमेंटचे शिकार व्हावे लागले. पुरस्कार घेताना तिचा ड्रेस फाटला. आश्चर्य म्हणजे, तिने आपला फाटलेला ड्रेस देखील दाखवला. तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

एमा स्टोनने आपला ड्रेस फाटण्यामागे रयान गॉसलिंग (Ryan Gosling) जबाबदार ठरवलं. तिने म्हटले की, रयानच्या परफॉर्मन्समुळे हे घडलं. रयानने ऑस्करच्या मंचावर दमदार परफॉर्मन्स दिला आणि एमानेदेखील डान्स केवा. दरम्यान, तिचा ड्रेस मागून फाटला. नंतर अभिनेत्री खूप भावूक आणि आनंदित होऊन भाषण दिलं. ती म्हणाली की, तिचा आवाज निघत नाही.

Oscars

१० वर्षांनंतर जिंकला दुसरे ऑस्कर पुरस्कार

एमा स्टोनला १० वर्षांनंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा दुसरा ऑस्कर मिळाला आहे. याआधी तिला बर्डमॅन (२०१४) साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. 'ला ला लँड' आणि 'द फेव्हरेट' साठी सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग अभिनेत्रीचे दोन ऑस्करदेखील मिळाले आहेत.

दरम्यान हॉलिवूड अभिनेत्री लिजा कोशी ही रेड कार्पेटवर पडली. ती पडल्यानंतरचा फोटो देखील व्हायरल होत अशून या फोटोमध्ये ती हसताना दिसतेय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT