Latest

Online Fraud : डोंबिवलीत तरुणाची ऑनलाईनद्वारे 33.28 लाखांची फसवणूक

अनुराधा कोरवी

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : गुंतवणुकीतून दामदुप्पट पैसे मिळतील, असे अमिष दाखवून भामट्यांनी म जवळच्या एमआयडीसी भागात राहणार्‍या एका तरूणाची ऑनलाईन व्यवहारातून 33 लाख 28 हजारांची फसवणूक केल्याचे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतून उघडकीस आले आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी फसगत झालेल्या तरुणाच्या तक्रारीवरून माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. (  Online Fraud )

गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. हेमांशु हर्षदकुमार शहा (40, रा. विको नाका, डोंबिवली-पूर्व) असे तक्रारदाराचे नाव आहे. गेल्या महिन्यात भामट्यांनी तक्रारदार हेमांशु यांना संपर्क साधला. त्यांना ऑनलाईन व्यवहारांची माहिती देऊन या व्यवहारात गुंतवणूक केल्यास झटपट दामदुप्पट पैसे मिळतील असे अमिष दाखविले. सुरुवातीला पैसे मिळत गेल्याने हेमांशु यांनी टप्प्याने एकूण 33 लाख 28 हजार रुपये ऑनलाईन व्यवहारातून गुंतवणूक केले. या गुंतवणुकीतून आकर्षक परतावा मिळणे आवश्यक होते. मात्र परतावा मिळणे बंद झाले.

मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

आकर्षक व्याज आणि मूळ रक्कम परत मिळावी म्हणून हेमांशु शहा भामट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. सुरूवातीला त्यांनी किरकोळ कारणे देऊन हेमांशु यांना प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांनी तक्रारदाराला प्रतिसाद देणे बंद केले. आपणास भामट्यांनी फसविल्याची खात्री पटल्यावर हेमांशु यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली.

या संदर्भात पोलिस उपनिरीक्षक पी. एस. गांगुर्डे अधिक तपास करत आहेत. गेल्या वर्षभरात कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात ऑनलाईन माध्यमातून फसवणुकीचे जवळपास 100 हून अधिक गुन्हे विविध पोलिस ठाण्यांतून दाखल करण्यात आले आहेत. (  Online Fraud )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT