Latest

एक कोटी लाच प्रकरण : अखेर वाघ पोलिसांच्या जाळ्यात

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  एक कोटींची लाच स्वीकारल्याच्या गुन्ह्यात संशयित आरोपी असलेला कार्यकारी अभियंता गणेश वाघ याला नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेत गजाआड केले आहे. मुंबईहून धुळ्याच्या दिशेने जात असताना नाशिकजवळ सापळा लावून त्याला पकडले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी वाघ याच्या आवाजाचे नमुने घेतले असून, त्याची घर झडतीही घेतली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत 100 एमएम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. 31 कोटींच्या कामाचे राहिलेले 2 कोटी 66 लाख 99 हजार 244 रूपयांचे बिल काढण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अहमदनगर उपविभागाचा सहाय्यक अभियंता अमित किशोर गायकवाड मागणी केली.

नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी शेंडी बाय घेऊन रस्त्याजवळ सापळा रचून तब्बल एक कोटी रूपयांची लाच घेताना अमित गायकवाड याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर अमित गायकवाड यांनी कार्यकारी अभियंता गणेश वाघ यांना फोन लावून पैसे घेतल्याची कल्पना दिली. त्यावरून लाच स्वतःसाठी व तत्कालीन उपविभागीय अभियंता वाघ याच्या करिता स्वीकारली असल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान याप्रकरणी सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याला पोलीस कुठली संपल्यानंतर न्यायालयाने जामिनावर सुटका केली. मात्र, अभियंता गणेश वाघ दहा दिवसांपासून पसार होता. त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर निर्णय होण्यापूर्वीच त्याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 19 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक स्वप्निल रजपूत गुन्ह्याचा तपास करीत आहेत. गुन्ह्यात आतापर्यंत संशयित आरोपी कार्यकारी अभियंता गणेश वाघ यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले असून तांत्रिक तपास पूर्ण करण्यात आला आहे. उद्या अभियंता गणेश वाघ यांच्या घराची झडती घेतली जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून समजली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT