पटना ; पुढारी ऑनलाईन : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर अज्ञाताने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बिहारमध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी ही घटना घडली. घटनास्थळी काही काळ गाेंधळ उडाला. सुत्रांच्या माहितीनुसार हल्ला केलेला व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे बोलले जात आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी बख्तियारपूर येथे एका व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये स्थानिक रुग्णालयाच्या आवारात त्यांच्या पुतळ्यासमोर मुख्यमंत्री राज्याचे स्वातंत्र्यसैनिक, शीलभद्र याजी यांना श्रद्धांजली वाहन्यासाठी जात असताना हा हल्ला झाल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसून आले.
व्हिडीओमध्ये मागून आलेला माणूस वेगवान पावलांनी स्टेजवर चढून नितीश कुमार यांच्या पाठीवर मारताना दिसला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला ताबडतोब बाहेर काढले.