संग्रहित छायाचित्र 
Latest

omicron variant in india : ओमायक्रॉन गुजरातमध्येही शिरला; भारतात बाधितांची संख्या तीनवर

backup backup

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

भारतात (omicron variant in india) कोरोना विषाणूच्या नवीन ओमायक्रॉन प्रकाराच्या संसर्गाची तिसरी घटना समोर आली आहे. झिम्बाब्वेहून परतलेल्या एका तरुणाला गुजरातमधील जामनगरमध्ये ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तरुणाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. गुजरातचे आरोग्य आयुक्त जय प्रकाश शिवहरे यांनी याची पुष्टी केल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

जामनगर येथील एका ७२ वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यानंतर नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आला. यानंतर, आज नवीन ओमायक्रॉनची लागण झाल्याची पुष्टी झाली. ओमायक्रॉनची लागण झालेली ही व्यक्ती जिथे राहते त्या ठिकाणाभोवती एक सूक्ष्म-कंटेनमेंट झोन तयार करण्यात आला आहे. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांची चाचणी केली जात आहे.

याआधी भारतात (omicron variant in india) आणखी दोन प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये एका ४६ वर्षीय डॉक्टरचा समावेश आहे, ज्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले होते. त्यांच्या प्रवास इतिहासही नव्हता आणि त्यांना ताप, अंगदुखी अशी लक्षणे होती. दुसरी व्यक्ती दक्षिण आफ्रिकेची नागरिक आहे, जो कोविड-19 चा निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन भारतात आला होता, परंतु येथे तो कोविड पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी झाली, जी नंतर ओमायक्रॉन प्रकार असल्याचे निष्पन्न झाले.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त आरोग्य सचिव मनोज अग्रवाल म्हणाले, "आम्ही त्याला आयसोलेशनमध्ये ठेवले आहे आणि त्यांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रॅकिंगची काळजी घेतली जात आहे. भारताने (omicron variant in india) सर्व परदेशी प्रवाशांची चाचणी आणि पाळत ठेवण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. विशेषत: जोखीम श्रेणीतील देशांमधून येणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. Omicron प्रकार प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT