लंडन, पुढारी ऑनलाईन : ब्रिटनमधील एका रुग्णालयातील नर्सला शुक्रवारी सात बाळांची हत्या आणि इतर सहा जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले. लुसी लेटबी (वय ३३) असे त्या 'बेबी सीरियल किलर'चे नावे आहे. तिच्यावर २०१५ आणि २०१६ दरम्यान उत्तर-पश्चिम ब्रिटनमधील काउंटेस ऑफ चेस्टर रुग्णालयात काम करत असताना सात बाळांना (पाच मुलगे आणि दोन मुली) मारल्याचा आरोप आहे. इतर सहा मुलांच्या हत्येचा तिने प्रयत्न केला. मुलांच्या रक्तप्रवाहात हवा भरणे, 'नैसोगॅस्ट्रिक ट्यूब'द्वारे मुलांचा पोटात हवा आणि अधिक प्रमाणात दूध सोडल्याचा तिच्यावर आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिने मारलेले एक नवजात बाळ तर केवळ एक दिवसाचे होते. (Nurse Lucy Letby)
सलाईनमध्ये इन्सुलिन मिसळल्याने मुलांच्या शरिरात विषबाधा झाली. तसेच तिने ऑक्सिजन नळीतही फेरफार केल्याचा तिच्यावर आरोप आहे. दरम्यान, नर्सने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पण एका भारतीय वंशाच्या बालरोगतज्ज्ञाने तिचे हे कृत्य उघडकीस आणले. त्याआधारे शुक्रवारी त्या नर्सला भ्रूणहत्येप्रकरणी ब्रिटिश न्यायालयाने दोषी ठरवले. चेस्टरमधील काउंटेस ऑफ चेस्टर रुग्णालयाचे डॉक्टर रवी जयराम यांनी म्हटले आहे की, जर त्या नर्सच्या विचित्र वर्तनाकडे लक्ष दिले गेले असते आणि पोलिसांना वेळेत त्याची माहिती दिली असती, तर काही मुलांचे प्राण वाचू शकले असते.
या निकालानंतर डॉ. जयराम यांनी आयटीव्ही न्यूजशी बोलताना सांगितले की, "जी चार अथवा पाच मुले आता शाळेत जाऊ शकली असती ती आता गेली नाहीत." ते पुढे म्हणाले की जून २०१५ मध्ये तीन बाळांचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यांच्यासारख्या वरिष्ठ डॉक्टरांनी लुसी लेटबी हिच्या कृतीबद्दल शंका व्यक्त केली होती.
एप्रिल २०१७ मध्ये नॅशनल आरोग्य सेवा (NHS) ट्रस्टने डॉक्टरांना पोलिस अधिकाऱ्याला भेटण्याची परवानगी दिली. डॉ जयराम म्हणाले, की १० मिनिटांपेक्षा कमी वेळात आमचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पोलिसांना कळले की हे गंभीर प्रकरण असून याचा तपास करावा लागेल. काही वेळातच या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर लुसी लेटबीला अटक करण्यात आली.
"मुलांना इजा पोहोचवून ती एक आसुरी आनंद घेत होती. जे काही चालले आहे त्याचा ती आनंद घेत होती. तिला माहीत असलेल्या गोष्टी घडणार आहेत याचा अंदाज ती सांगत होती.," असे या खटल्यातील एका वकिलाने सांगितले. या खटल्यात सुनावणीदरम्यान वकिलाने असेही सांगितले की लेटबी चेस्टर रुग्णालयातील एका विवाहित डॉक्टरसोबत रिलेशनशीपमध्ये होती. तो अशा डॉक्टरांपैकी एक होता जेव्हा बाळाची तब्येत बिघडल्यानंतर त्याच्याशी संपर्क केला जात होता. तिच्याकडे वैयक्तिक लक्ष वेधण्यासाठी तिने बाळांना नुकसान पोहोचवले, असे यातून सूचित केले गेले. पण लेटबीने ते मान्य केले नाही.
न्यायालयात दाखवण्यात आलेल्या मेसेजीवरुन हे उघड झाले की या दोघांनी अनेकवेळा एकमेकांना लव्ह हार्ट इमोजींचे मेसेज पाठवले होते. लेटबायला जुलै २०१६ मध्ये नवजात मुलांच्या युनिटमधून काढून टाकल्यानंतरही बाहेर ते अनेकवेळा एकमेकांना भेटले.
बीबीसीच्या वृत्तानुसार, नवजात मुलांची हत्या केल्यानंतर काही तासांत लेटबायने पाठवलेले टेक्स्ट मेसेज तिच्याविरुद्धच्या पुराव्याचा एक महत्त्वाचा भाग होता. यातूने असे दिसून येते की तिने बाळांच्या मृत्यूनंतर सहकाऱ्यांना कसे मेसेज पाठवले. अनेकदा त्यांना तिने बाळांच्या मृत्यूची माहिती दिली. या बदल्यात तिने त्यांची सहानुभूती मिळवली.
२०१७ मध्ये या प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि संशयाची सुई नर्स लुसी लेटबी हिच्याकडे रोखली गेली. कारण ती मुलांच्या देखरेखीचे काम करत असे. लुसीच्या घराची झडती घेतली असता, तेथून अनेक धक्कादायक पुरावे हाती लागले. तिने तिच्या डायरीत 'मी एक सैतान आहे' आणि 'मी हे केले' असे लिहिले होते. त्यानंतर पुढे अधिक तपास करण्यात आला आणि लुसीने नवजात मुलांची हत्या केल्याचे उघड झाले. (Nurse Lucy Letby)
हे ही वाचा :