Latest

आता जमीन खरेदी-विक्रीसह सर्व प्रक्रिया ऑनलाइन

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: जमीनविषयक दावे असो किंवा फेरफारवर नोंद घेणे असो, अशा सर्वच गोष्टींची माहिती आता तुम्हाला घरबसल्या मिळणार आहे. त्यासाठी महसूलबरोबरच नोंदणी व मुद्रांक शुल्क आणि भूमिअभिलेख या तिन्ही विभागाचे एकत्रीत 'ईक्युजेकोर्ट अ‍ॅप' र्व्हजन-2 विकसित करण्याचे काम भूमिअभिलेख विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे खरेदी-विक्रीपासून ते नाव नोंदणीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

जमिनविषय दाव्यांच्या सुनावणी साठी पक्षकार व वकील यांना दिवसभर थांबावे लागले. आपल्या केसचा नंबर कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष असते. तसेच एकाच ठिकाणी गर्दी होते. आता हे चित्र बदलण्यासाठी जमिनीच्या केसेसच्या सुनावनीची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी 'ईक्युजेकोर्ट लाईव्ह बोर्ड पुणे' असे अ‍ॅप महसूल विभागाकडून विकसित करण्यात आले. या अ‍ॅपच्या माध्यमातून सध्या कोणत्या केसची सुनावणी आहे. आपल्या केसची सुनावणी किती वाजता होणार आहे याची माहिती मोबाईलवरच पक्षकारांना मिळते. देशातील हा पहिलाच उपक्रम ठरला. येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण करून संपूर्ण राज्यात त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अ‍ॅपमध्ये वकिलांना देखील नोंदणी करावी लागणार आहे.

काय होणार फायदे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यास मदत
मोबाईलवर प्रकरणाची प्रत्येक स्टेप कळणार
वेळेची बचत आणि कारभारात पारदर्शकता
प्रकरणांचा निपटारा वेळेत

केंद्र सरकारच्या 'यूपीवायएमए' अंतर्गत 'ईक्युजेकोर्ट अ‍ॅप' र्व्हजन 2 हे विकसित करण्याचे काम एनआयसीमार्फत सुरू करण्यात आले आहे.
-सरिता नरके, अतिरीक्त जिल्हाधिकारी, भूमी अभिलेख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT