आता बातमी लिहिण्यासाठीही मदत करणार ‘एआय’ टूल्स  
Latest

Artificial Intelligence : आता बातमी लिहिण्यासाठीही मदत करणार ‘एआय’ टूल्स

Arun Patil

वॉशिंग्टन : सध्याचे जग हे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे आहे. अनेक क्षेत्रांमध्ये विविध कामांसाठी 'एआय'चा वापर सुरू आहे. आता 'गुगल' बातम्या, लेख लिहिण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स म्हणजेच 'एआय'चा वापर करत आहे. या साधनांचा वापर पत्रकारांनी आपल्या दैनंदिन कामात करावा, यासाठी वृत्त संस्थांशी चर्चादेखील करत आहे. 'गुगल'कडून यासंदर्भात माहिती देण्यात आली. गुगलने वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल आणि अगदी न्यूयॉर्क टाईम्ससह इतरांशी चर्चा केली आहे.

ही 'एआय' साधने पत्रकारांना हेडलाईन्स किंवा वेगळ्या प्रकारच्या लेखन शैलीसाठी विविध पर्याय देऊन मदत करू शकेल. यातून पत्रकारांच्या कामातील उत्पादकता वाढेल असे सांगण्यात आले. आम्ही विविध कल्पना शोधण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत, अशी माहिती गुगलच्या प्रवक्त्याने दिली. पत्रकारांना त्यांच्या लेखांचे अहवाल तयार करण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने ही साधने मदत करतील. असे असले तरी बातमीतील 'रिपोर्टिंग', 'फॅक्ट' हा पत्रकारितेचा मूळ गाभा हे एआय टूल्स बदलू शकत नाहीत. ते पत्रकारांना स्वत:च करावे लागणार आहे.

गुगलकडून करण्यात आलेल्या या विनंतीला न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्टने त्वरित प्रतिसाद दिला नाही. न्यूयॉर्क टाईम्सने यासंदर्भात माहिती दिली आहे. एआयचा वापर करताना आजही तथ्यात्मक चुकीची माहिती निर्माण होते. तसेच माणसाने तयार केलेल्या आणि संगणकाच्या मदतीने एआयने तयार केलेल्या कंटेंटमध्ये मोठा फरक स्पष्ट दिसतो. हे मोठे आव्हान असल्याने बातम्या प्रकाशने तंत्रज्ञानाचा अवलंब कमी गतीने करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT