Latest

Nothing 1 : जुन्या फुटक्या मोबाईल फोनसारख्या डिझाईनच्या Nothing फोनची इतकी चर्चा का?

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाजारात दररोज कोणता तरी नवीन मोबाईल फोन लाँच होत असतो. आयफोनच्या नव्या फोनसाठी तर ग्राहक चातकासारखी वाट पाहात असतात. यातच Nothing नावाचा एक फोन लाँच होत आहे. या फोनची मागील बाजू ही पूर्ण पारदर्शी आहे. एक प्रकारे फुटलेल्या फोनसारखा हा फोन दिसतो. सध्या सोशल मीडियावर या फोनची चांगलीच चर्चा रंगली आहे. Nothing 1 नावाने हा फोन लवकरच बाजारात येत आहे.

कार्ल पाय यांनी या कंपनीची स्थापना केली आहे. वन प्लस या फोनच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान आहे. पाय यांनी आता Nothing 1 या फोनची कँपेन सुरू केली आहे. कार्ल पाय यांनी टॉम हॉवर्ड यांच्यासोबत ही कंपनी स्थापली आहे, या फोनमध्ये एकूण ४०० सुटे भाग आहेत.

वायरशिवाय चार्जिंग आणि कॅमेरा हे या फोनचे वैशिष्ट्य असणार आहे.

पाय म्हणतात, "आम्ही या फोनच्या डिझाईनवर बरेच काम केले आहे. डिझाईनच्या बाबतीत घेतली की काळजी तुम्ही स्वतः पाहू शकता. डिझाईनच्या बाबतीत आम्ही जे सातत्य दाखवले आहे, त्याची तुलना फक्त आयफोनशीच होऊ शकते." (Nothing 1)

फोनचे सुटेभाग अतिशय फारच खुबीने जोडलेले आहेत. त्यामुळे मागील पारदर्शक बाजू जास्तच सुंदर दिसते.

"अर्थात फक्त डिझाईनवरच नाही तर फॉर्म आणि फंक्शन या दोन्ही बाजूंवर आम्ही चांगले काम केलेले आहे. त्यामुळे ग्राहक या फोनला चांगला प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे," असे होवार्ड यांनी म्हटले आहे.

या फोनची वैशिष्ट्य अशी

१. ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड असेल.
२. ६.४३ इंचाचा FHD + Amoled डिस्प्ले
३. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७७८ जी चिपसेट
४. ८ जीबी रॅम
५. ४५०० mAh क्षमतेची बॅटरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT